बॉलिवूड मधील कलाकारांची लग्न काही फारशी यशस्वी ठरत नाहीत असा बॉलिवूडचा इतिहासच सांगतो. परंतु या अशा इतिहासात देखील काही जोड्या अशा आहेत ज्यांनी एकदाच लगीनगाठ बांधली ती आजतागायत तशीच आहे. कोणत्या आहेत या जोड्या चला तर मग एक नजर टाकूयात!
१.दिलीप कुमार – सायरा बानू
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि जेष्ठ अभिनेत्री सायरा बानू हे खऱ्या आयुष्यातदेखील पती पत्नी आहेत. आणि यांची जोडी ही सर्वात यशस्वी जोडी मानली गेली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी दिलीप कुमार यांनी २२ वर्षांच्या सायरा बानू यांच्याशी ११ ऑक्टोबर १९६६ मध्ये लग्न केलं होतं. आजच्या घडीला त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली आहेत. तिथून ते आजतागायत या दोघांनी कधीच एकमेकांची साथ सोडलेली नाही.
२. अमिताभ आणि जया बच्चन
बॉलिवूडचे बादशहा बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रेमकहाणी कुणाला माहीत नाही. ३ जून १९७३ रोजी या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं. या दोघांच्याही लग्नाला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही सुख दुःखात एकमेकांना हे दोघेही साथ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
३. शत्रुघ्न सिन्हा आणि पूजा सिन्हा
शत्रुघ्न आणि पूजा सिन्हा यांची प्रेमकहाणी कुठल्याही सिनेमापेक्षा कमी नाही आहे. हे दोघेही एकमेकांना ट्रेन मध्ये भेटले होते आणि भेटताच क्षणी एकमेकांवर प्रेम करून बसले. बॉलिवूडची शॉटगन असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना लग्नासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा कुठे या दोघांचं १९८० मध्ये लग्न झालं. याच वर्षी या दोघांच्याही लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.
४. अनिल कपूर आणि सुनीता कपूर
अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांनी १९८४ मध्ये लग्न केलं आणि आज त्यांच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ३६ वर्षांमध्ये अनिल आणि सुनीता यांनी एकत्र राहून आपसातील प्रेमच वाढवलं आहे. आजही ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.
५.जॅकी श्रॉफ आणि आयशा दत्त
शाळेच्या गणवेशातील एक मुलीला बस स्टॅण्ड वर पाहून तिच्या प्रेमात पडणारा हा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ ! आणि ती मुलगी म्हणजे त्याची पत्नी आयशा दत्त – श्रॉफ. १९८७मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि आजतागायत सुखी संसार करत आहेत. आज यांचा संसार ३३ वर्षांचा झाला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-