Monday, June 17, 2024

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

आज रीमा लागू (Reema Lagoo) या प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ज्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये सर्वाधिक २५ वेळा आईची भूमिका साकारून, एक वेगळी ओळख निर्माण केली होती. रीमाचे खरे नाव ‘नयन भडभडे’ होते आणि त्यांची आई मंदाकिनी या हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीमाच्या घरी अनेकदा चित्रपटांशी संबंधित गोष्टी होत असत आणि इथूनच त्यांच्या मनात चित्रपटांबद्दलची आवड वाढू लागली. रीमाने अनेक चित्रपटांमध्ये मोठ्या स्टार्सच्या आईची भूमिका साकारली. मात्र त्या मोठ्या पडद्यावर, एकूण सात वेळा सलमान खानच्या (Salman Khan) आईच्या भूमिकेत दिसल्या. 

मात्र, आज आम्ही तुम्हाला रीमा लागू यांच्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा सांगणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरी रीमा चित्रपटांमध्ये साईड भूमिकेत दिसायच्या, परंतु त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्या चांगल्या चांगल्यांवर भारी पडत असत. असाच काहीसा प्रकार ‘गुमराह’ चित्रपटात घडला, ज्यात रीमा अभिनेत्री श्रीदेवीच्या (Sridevi) आईची भूमिका साकारत होत्या. (reema lagoo amazing acting skills made sridevi insecure)

असे म्हणतात की, या चित्रपटात रीमाने इतका जबरदस्त अभिनय केला होता की, श्रीदेवीला असुरक्षितता वाटू लागली होती. याचाच परिणाम असा झाला की, श्रीदेवी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी बोलून रीमा लागू यांच्या अनेक सीन्सला कात्री लावली.

रीमा लागू यांनी हिंदी चित्रपटांमधील पांढरे केस असलेली वृद्ध आईची पारंपरिक प्रतिमा मोडीत काढत काळ्या केसांची एक सुंदर स्त्री असू शकते हे सिद्ध केले. बॉलीवूडमध्ये, रीमा लागू एक ‘कूल मॉम’ चे उदाहरण म्हणून उदयास आली आणि तिच्या पिडीत विवाहितेच्या भूमिकेच्या विपरीत. तिने अनेक चित्रपटांमधील भूमिकांद्वारे बॉलिवूडमध्ये आपली एक प्रिय आई म्हणून आपली प्रतिमा प्रस्थापित केली आहे.

खरं तर, श्रीदेवी त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांना कोणीही रागावू इच्छित नव्हते. मात्र, आता रीमा आपल्यामध्ये नाहीत. २०१७ मध्ये या अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?
परी म्हणू की सुंदरा! कान्समध्ये साराच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा