टेलिव्हिजन विश्वातील विवादित शो अशी ओळख असलेल्या बिग बॉसमुळे घराघरात प्रसिद्ध झालेला अभिनेता म्हणजे एजाज खान. २०२१ साली एका अंमली पदार्थांच्या संबंधित नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कडून मुंबई एयरपोर्टवर त्याला अटक केली होती. एनसीबीने त्याला मार्च २०२१ साली अल्प्राजोलम नावाच्या ड्रग्स आणि ३१ गोळ्यांसोबत अटक केली होती. त्याचे एकूण वजन ४.५ ग्रॅम होते. यानंतर त्याला मुंबईच्या आर्थर रॉड तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्याची २ वर्षांनी जामिनावर सुटका होत आहे.
एजाज खानचे कुटुंब मागील दोन वर्षांपासून कोर्टात त्याच्या सुटकेसाठी केस लढत होते. २०२२ साली कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला. हा देताना कोर्टाने त्याचा या केसमध्ये थेट संबंध असून त्याला पुराव्यांसोबतच अटक केली असल्यामुळे आणि पैशाची देखील देवाण घेवाण झाल्याने जामिनास नकार दिला होता.
दोन वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर १९ मे ला संध्याकाळी त्याला सोडण्यात येणार आहे. एजाज खानला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या पत्नीने सांगितले की, त्यांचे संपूर्ण कुटुंब खूपच खुश असून, परिवारात मोठा जल्लोष होत आहे. त्याला बघण्यासाठी आता कोणीही वाट पाहू शकत नसल्याचे देखील तिने सांगितले.
ड्रग पेडलर्स असलेल्या शादाब शेख उर्फ शादाब बटाटा यांच्यासोबत सामील असल्याच्या आरोपावरून एजाजला अटक झाली होती. अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले होते की एजाजने बटाटाकडून ड्रग्ज घेतले आणि स्वतः त्याचे सेवन देखील केले होते. इजाजने ड्रग्जचा व्यापार देखील केला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’










