Monday, May 11, 2026
Home मराठी रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

आज आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मातृभाषेपेक्षा आणि राष्ट्रभाषेपेक्षा इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व आले आहे. सगळीकडे इंग्रजी भाषेचे वाढणारे वर्चस्व हिंदी आणि प्रादेशिक भाषांसाठी खासकरून मराठीसाठी खूपच धोकादायक झाले आहे. कारण असेच होत राहिले तर मराठी भाषेचा ऱ्हास नक्कीच आहे. महाराष्ट्रात देखील मराठी भाषेला आज किंमत उरली नाही. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषांमध्ये लिहिलेल्या पाट्या पाहिल्या तर आपल्यालाच वाचताना लाज वाटते.

कलाकार देखील अनेकदा चुकीच्या मराठीबद्दल बोलताना, मराठी भाषा जपताना पुढाकार घेताना दिसतात. सोशल मीडियावर तर अनेकदा चुकीच्या मराठी भाषेतील पाट्या, माहिती बोर्डचे फोटो व्हायरल होताना आपण बघतो. ते पाहून हसतो आणि ते पुढे फॉरवर्ड करतो, मात्र त्यावर काहीच ऍक्शन घेत नाही. अशाच मराठी भाषेबद्दल एक मोठी चूक भारतीय रेल्वेकडून करण्यात आली आहे. सध्या ‘तेजस एक्सप्रेस’ची चांगलीच चर्चा आहे. या ट्रेनमधील सुविधा, कम्फर्ट आदी अनेक चांगल्या गोष्टींसाठी ही ट्रेन चर्चेत असते. मात्र याच ट्रेनमध्ये मराठीची एक मोठी चूक झाली असून, ती चूक अभिनेता समीर खांडेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या लक्षात आणून दिली आहे.

समीर या तेजस एक्सप्रेसने प्रवास करत असताना ट्रेनमध्ये काही सूचना डिजिटल बोर्डच्या माध्यमातून येत होत्या, त्यामध्ये मराठी भाषेतल्या सुचनांमध्ये प्रचंड मोठ्या चुका होत्या. त्याचाच एक व्हिडिओ समीर खांडेकरने पोस्ट केला आहे. त्यात लिहिले आहे की, ‘तुमची आपल्या वस्तू एका बाजूला ठेवू नये.’ ‘कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे.’ ‘कृपया चालू गाडीमध्ये चडू नये.’ ‘ही रेल्वे छ. शिवाजी महाराज स्टेशन वासून मडगांव स्टेशन पर्यंत जाणार आहे.’ ‘तुमच्या प्रवास सुखाचा आणि सोयीची हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा,’ असे लिहून येताना दिसून येते.

हा व्हिडिओ पोस्ट करताना समीरने कॅप्शनमध्ये लिहिले, “आम्ही Dome मधून बाहेर बघण्यातच रमलेलो असतो. प्रिय, इंडियन रेल्वे, मराठी माध्यमातल्या ४ थीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी चाललं असतं! या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत. कृपया, वेळीच त्यात बदल करा”. पुढे त्याने हे देखील म्हटले आहे की, “मित्रांनो खूप लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट केला नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संबधीत हॅंडलला ट्वीट करुन या Tejas Express मधल्या चुकीच्या ‘मराठी सूचनांची’ दखल घ्यायला भाग पाडा.”

त्याच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. दरम्यान समीर मराठीमधील एक प्रतिभावान अभिनेता असून, त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

हे देखील वाचा