Monday, February 3, 2025
Home अन्य हिना खानच्या एक्सप्रेशन्सने केला चाहत्यांच्या काळजावर वार! ‘ऍक्टिंंग चॅलेंज’च्या व्हिडिओचं होतंय भरभरून कौतुक

हिना खानच्या एक्सप्रेशन्सने केला चाहत्यांच्या काळजावर वार! ‘ऍक्टिंंग चॅलेंज’च्या व्हिडिओचं होतंय भरभरून कौतुक

हिना खान मनोरंजन जगातील एक अतिशय सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ती अशा कलाकारांच्या यादीमध्ये येते, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्व:ताचे नाव कमावले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली ‘अक्षरा’ म्हणजेच हिना खानला प्रेक्षक खूप पसंत करतात. हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. यादरम्यान, हिना खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही जोरदार प्रतिसाद देत आहेत.

हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, ऍक्टिंंग चॅलेंज स्वीकारत एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाची एक झलक पाहायला मिळाली. यात अभिनेत्री क्षणोक्षणी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देताना दिसली ​​आहे. कधी ती रडते, तर कधी आनंदी होते. या व्हिडिओमध्ये हिनाचा आवाज नसला तरी, तिचे एक्सप्रेशन्स तिच्या भावना समजावून सांगत आहेत.

त्याचबरोबर अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबतच कलाकारही आश्चर्यचकीत झाले आहेत. या व्हिडिओचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे. तसेच, चाहतेही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने तिला ‘एक्सप्रेशन्स क्वीन’, तर दुसर्‍याने ‘इमोशन क्वीन’ म्हटले आहे. त्याचवेळी काही युजर्स तिला रोजाबद्दलही विचारताना दिसले.

हिना खान बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते असते. यामुळे ती तिच्या चाहत्यांशी संपर्कातही राहते. चाहत्यांनाही तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात. नुकतेच, हिना खान आणि स्टेबिन बेन यांचे ‘बेदर्द’ हे गाणे रिलीझ झाले आहे. हे ‘हार्टब्रेकिंग’ गाणे स्टेबिन बेन यानेच गायले आहे. तसेच, गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गाण्याला पॉकेट एफएमच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी गाण्याला खूप प्रेम दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा