भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार खेसारी लाल यादवचे प्रत्येक गाणे रिलीझ होताच यूट्यूबवर राडा करते, मग ते गाणे चित्रपटातील असो किंवा अल्बममधील. नुकतेच त्याचे ‘पड़ोसन शोषण करती है’ हे नवीन गाणे यूट्यूबवर रिलीझ झाले आहे. गाण्याला अवघ्या काही तासांतच २ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नीलकंठ फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ झालेले हे गाणे, खेसारीलाल यादवने आपल्या खास स्टाईलमध्ये आणि अतिशय मजेदार मूडमध्ये गायले आहे.
खेसारीलाल यादवच्या या अल्बमचा आता केवळ ऑडिओ रिलीझ झाला आहे. त्याचा व्हिडिओही लवकरच रिलीझ करण्यात येईल. २०२१च्या या ऑडिओ गाण्याला खेसारीलाल यादवचे चाहते आणि रसिकांकडून खूपच पसंती मिळत आहे.
सोनू सरगम आराने खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ या नवीन गाण्याचे गीत लिहिले आहेत, तर रोशन सिंग यांनी संगीत दिले आहे. हे गाणे खेसारी लाल यादवसोबत शिल्पी राजनेही गायले आहे. तसेच, गाणे १९ एप्रिल रोजी रिलीझ झाले होते आणि आतापर्यंत याला २८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ या गाण्याने यूट्यूबवर अक्षरशः राडा केला आहे. खेसारी लालचा खास अंदाज, या गाण्याला एक वेगळेच रूप देत आहे. गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून, खेसारी लालने प्रतिक्रिया व्यक्त केली.
तो म्हणाला की, “हे माझे चाहते आणि भोजपुरीच्या सर्व संगीतरसिकांचे प्रेम आहे, जे माझ्या गाण्याला इतकी पसंती देतात. माझ्या नवीन गाण्यात नक्कीच काहीतरी खास आहे, जेणेकरून प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देत आहेत. गाण्याला लाखो व्ह्यूज आले आहेत. मी सर्वांना म्हणेल की, तुम्ही पुढेही तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद असाच ठेवत राहा. अशी शुद्ध देसी लोकगीते तुम्ही ऐकली पाहिजेत आणि भोजपुरी लोकगीतांची परंपरा जपली पाहिजे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ
-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश
-याला म्हणतात अष्टपैलू कलाकार! नवाजुद्दीन सिद्दिकीने हातात चुडिया घालत गायलेय हटके गाणे
-बेदर्द निकले वो! प्रेमात धोका झालेल्या प्रत्येकानेच पाहायला हवं, असंय हिना खान नवकोरं गाणं ‘बेदर्द’