Wednesday, August 6, 2025
Home कॅलेंडर क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केला पतीसोबतचा व्हिडिओ, एनसीबीत मोठ्या पदावर आहे ‘मिस्टर वानखेडे’

क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केला पतीसोबतचा व्हिडिओ, एनसीबीत मोठ्या पदावर आहे ‘मिस्टर वानखेडे’

क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. क्रांती सतत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच क्रांतीने तिच्या नवऱ्याचा म्हणजे समीर वानखेडेच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच त्या दोघांचे फोटो पोस्ट केले आहे.

नुकताच क्रांतीच्या नवऱ्याचा म्हणजे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा वाढदिवस झाला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कृतीने पहिल्यांदाच त्यादोघांचा एकत्र एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना क्रांतीने लिहिले की, “माझ्या विश्वाचं केंद्रस्थान असलेल्या या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम करते, त्याचा आदर करते. तुझ्याबद्दल मला नेमकं काय वाटतं? हे सांगण्यासाठी नेहमीच शब्द कमी पडतात. तू माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. नेहमी आनंदी राहा. तुझ्या जगण्याचं कारण, जिद्द आणि तुझी मुल्ये हीच खरी तुझी ताकद आहे, त्यासाठी तुला सलाम’.

क्रांती रेडकारचे जेव्हा लग्न झाले तेव्हा ते अगदी खाजगी आणि गोपनीय पद्धतीत झाले. क्रांतीने अगदी मागील काही महिन्यांपर्यंत तिच्या नवऱ्याचा फोटो कधीही सोशल मीडियावर पोस्ट केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास सुरु झाला आणि या तपासा दरम्यान अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. त्यातीलच एक म्हणजे ड्रग्ज कनेक्शन. हे ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर या तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात ‘एनसीबी’ टीम सहभागी झाली. याच टीमचे अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. यानंतर समीर सतत चर्चेत राहिले. हळू हळू त्यांचे आणि क्रांतीचे नवरा बायको हे नाते देखील जगासमोर आले. समीर आणि क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत.

२००४ च्या बॅचचे समीर आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. नंतर त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाड टाकली आहे.

हे देखील वाचा