Saturday, March 21, 2026
Home साऊथ सिनेमा सिद्धार्थबरोबर ‘या’ अभिनेत्रीला करायचा होता सुखी संसार, ऐनवेळी ब्रेकअप करत केले सुपरस्टारच्या मुलाशी लग्न

सिद्धार्थबरोबर ‘या’ अभिनेत्रीला करायचा होता सुखी संसार, ऐनवेळी ब्रेकअप करत केले सुपरस्टारच्या मुलाशी लग्न

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी ही तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वत्र ओळखली जाते. तिने घातलेला प्रत्येक ड्रेस फॅशन ट्रेंड होत असतो. सामंथाचे फॅन फॉलोविंग देखील मोठे आहे. सोशल मीडियावर तिचे कोणतेही फोटो शेअर होताच क्षणी व्हायरल होत असतात. केवळ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील तिचे चाहते पसरले आहेत. सामंथाने अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी 2017 मध्ये लग्न केले आहे. तिचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील खास गोष्टी.

लग्नाच्या आधी सामंथा ही ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थवर प्रेम करत होती. ते दोघे लग्न देखील करणार होते. पण अचानक त्यांच्यामध्ये वाद झाले‌ आणि त्या दोघांचे ब्रेकअप झाले. सामंथा त्याच्या बाबतीत खूप सीरियस होती. पण त्यांच्या ब्रेकअप‌ नंतर तिने काही दिवसातच नागाचैतन्य सोबत लग्न केले. त्यांचे लग्न खूप धूमधडाक्यात झाले.

सिद्धार्थ आणि सामंथाची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटानंतर त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले होते. त्यावेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु तेव्हा त्या दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. पण एका कार्यक्रमात डान्स करताना सिद्धार्थने सामंथाचे नाव घेतले होते. त्यावेळी ती लाजली होती. त्यावेळी सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल समजले.

तेव्हा माध्यमांत आलेल्या काही वृत्तांनुसार, सामंथा आणि सिद्धार्थ त्यांच्या रिलेशनबाबत खूप सीरियस होते. ते लिव्हइनमध्ये राहत होते. ते दोघे जवळपास अडीच वर्ष एकमेकांसोबत होते. परंतु त्यानंतर त्यांची भांडण व्हायला लागली आणि त्यांचे ब्रेक अप झाले. परंतु त्यांच्या ब्रेक अपमागचे काही कारण अजुनही कोणालाच समजले नाही.

एका मुलाखतीत सामंथाने सिद्धर्थबाबत अनेक गोष्टी सांगितले होत्या. त्यावेळी ती म्हणाली होती की, “मी माझ्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग बघितले आहेत. चांगली गोष्ट अशी की, माझ्या काही नात्यांच्या सुरुवातीलाच अनेक गोष्टी समजल्या होत्या. हळूहळू मला या गोष्टीची जाणीव झाली की, पुढे जाऊन खूप काही गोष्टी घडू शकतात. मी देवाचे धन्यवाद मानते की, माझ्या आयुष्यात नागाचैतन्यसारखा जोडीदार मिळाला आहे.”

हे देखील वाचा