Saturday, August 15, 2026
Home बॉलीवूड ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘पार्टिशन 1947’ला मागे टाकत पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘पार्टिशन 1947’ला मागे टाकत पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

बहुप्रतिक्षीत चित्रपट आवारापन 2 आणि पार्टिशन 1947 हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. आणि त्यामुळे चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसवर स्पर्धा रंगेल का वाटत होते. मात्र 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांपैकी, प्रेक्षकांना इम्रान हाश्मीच्या ‘शिवम पंडित’ या लोकप्रिय भूमिकेत अधिक रस वाटत आहे असे दिसुन आले. या ‘आवारपन 2’ चित्रपटाने सुरुवाती पासुनच आघाडी घेतली आहे. याच्या तुलनेत पार्टिशन 1947 चित्रपटाला प्रेक्षकांची उपस्थिती कमी लाभली आहे. 

या चित्रपटाच्या ऍ़डवान्स बुंकिगापासुनच बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवराच फरक दिसुन आला. फिल्म ट्रॅकर्सनुसार, आवारापन 2 ने 11 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पार्टिशन 1947 साठी आगाऊ बुकिंग केवळ 4 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होते. आणि रिलीज नंतर आवारापन चित्रपटाने 9033 शोजमध्ये सुरू असलेल्या ‘अवारपन 2’ ने 25 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन नोंदावले आहे. आणि ‘पार्टिशन 1947’ ला केवळ 6.84 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन मिळाले आहे.

आवारापन (Awarapan) 2 चित्रपटाच्या उत्तम ओपनिंगमागे सर्वात मोठे कारण म्हणजे या चित्रपटाचा पहिला भाग जो 2007 मध्ये रिलीज झाला होता आणि तो चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडला. त्यामुळे यांच्या सिक्वेलला प्रेक्षकांचा आता प्रंचड प्रतिसाद मिळत आहे.

‘पार्टिशन 1947’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद जरी आता कमी मिळाला असला तरी त्यानी या वीकंएंडला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आणि या वीकएंड नंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद किती प्रमाणात मिळतो हे पाहण्यासारखे राहिल.

हेही वाचा

2026 मध्ये सर्वाधिक पाहिली गेली अर्शद वारसीची हि वेब सीरीज, IMDb वर आहे 7.8 रेटिंग

हे देखील वाचा