Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

माधुरी दीक्षितला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ; व्हिडिओ पाहूण केदार शिंदे म्हणाले…

बाॅलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय. तिने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. मात्र माधुरीच्या डान्सची अदासुद्धा काही वेगळीच असते. माधुरीच्या ठुमक्यांनी 90च्या दशकातील प्रत्येक अभिनेत्याला नाचायला भाग पाडले होते. हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितच्या नावाचा पहिल्यांदा समावेश केला जातो. यादरम्यान माधुरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असते. माधुरी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते माधुरीच्या पोस्तचे तोंडभरून कौतूक करत असतात. सध्या माधुरीचा लाल रंगातच्या साडीतला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिने ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते खूप साऱ्या कमेंट करत आहेत.

माधुरीच्या या व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधून घेतल आहे. तिच्या या व्हिडिओवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमेंट केली आहे. त्यांनी लिहीले की, “मनापासून धन्यवाद. माझ्या “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटातलं हे गाणं आहे. तुम्ही ते सादर केलं याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट @primevideoin वर उपलब्ध आहे. नक्की पाहा एका मराठी थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र”

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

यादरम्यान, “महाराष्ट्र शाहीर” या सिमेनातील गाण्यांना प्रेक्षकांना अगदी वेड केल आहे. या चित्रपटाची आणि गाण्यांची क्रेझ सोशल मीडियावर प्रचंड वाढत आहे. हा सिनेमा केदार शिंदे दिग्दर्शत आहे. या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Madhuri Dixit is fascinated by the song ‘Bahrla Ha Madhumas’)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने क्रिती सेननला मंदिरात निरोप देताना केले ‘हे’ कृत्य, भाजप नेते भडकले

हे देखील वाचा