Tuesday, October 15, 2024
Home बॉलीवूड ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने क्रिती सेननला मंदिरात निरोप देताना केले ‘हे’ कृत्य, भाजप नेते भडकले

‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने क्रिती सेननला मंदिरात निरोप देताना केले ‘हे’ कृत्य, भाजप नेते भडकले

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि प्रभास यांचा ‘आदिपुरुष‘ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच क्रिती सेनन आणि ओम राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रेलर प्रमोशनच्या कार्यक्रमानंतर चित्रपटाची टीम तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. त्यावेळी सर्वजण एकमेकांचा निरोप घेत होते, त्याच दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मंदिराच्या प्रांगणात क्रिती सेननचा निरोप घेतला. ज्यावर मंदिरावर श्रद्धा असणारे लोक चांगलेच संतापले. यासोबतच भाजप नेत्यानेही आक्षेप घेतला.

या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास प्रभु श्रीरामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्हिडिओमुळे ओम राऊत यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओमध्ये ‘आदिपुरुष’ची टीम मंदिराबाहेरील अंगणात उभी असलेली दिसत आहे.

त्याच वेळी, व्हिडिओमध्ये, जेव्हा क्रिती तिथून निघून तिच्या कारकडे जाऊ लागते. यादरम्यान, ओम राऊतने क्रितीला मिठी मारली आणि तिच्या गालावर चुंबन घेतले. मंदिराच्या परिसरात एवढी आपुलकी दाखवणाऱ्या ओमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंदिराच्या आवारात असे कृत्य केल्यामुळे भावना दुखावल्या गेल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

दुसरीकडे भाजपचे आंध्र प्रदेशचे सचिव रमेश नायडू यांनीही या व्हिडिओचा तीव्र निषेध केला आहे. त्यांना ट्विट करत लिहिले की, ‘पवित्र ठिकाणी असे उपक्रम करणे आवश्यक आहे का? तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर चुंबन घेणे आणि मिठी मारणे यासारख्या गोष्टी करणे आवश्य आहे का. हे खपवून घेतले जाणार नाही.’ त्यानंतर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे.

चित्रपटाविषयी बोलायच झाले तर, ‘आदिपुरुष’ (Adipurush) 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चा अंतिम ट्रेलर रिलीज केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (Directly in the temple Adipurush director Om Raut kissed Kriti Sanon)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धनश्री काडगावकरची चिमुकल्या लेकासाठी पोस्ट; म्हणाली, “मी फार मोठी चूक केली”
अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा