कलाकरांना ग्लॅमर जगात वावरताना आपल्या फिटनेसची प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्यासाठी कलाकार विविध प्रकारचे डाएट करतात, जिम, योगाचा आधार घेतात. कलाकार नेहमी आपली फिटनेस मेंटेन ठेवतात. या इंडस्ट्रीमधील चाळीशी पार केलेल्या अभिनेत्री देखील विशीतल्याच असल्याचे दिसते. इतका कमालीचा फिटनेस त्या अभिनेत्री जपतात. अशाच खूप सुंदर अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री श्वेता तिवारीचे नाव घेतले जाते.
टेलिव्हिजन स्टार श्वेता (Shweta Tiwari) दोन मुलांची आई आहे. तिने चाळीशी ओलांडूनही तिची फिटनेस खूपच उत्तम पद्धतीने राखते. टीव्ही इंडस्ट्रीमधील श्वेता एक टॉपची अभिनेत्री आहे. ती तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. श्वेताने स्वतःच्या हिंमतीवर या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. श्वेता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. श्वेता सतत तिचे आणि तिच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अशातच सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहेत.
श्वेताने अलीकडेच तिच्या चाहत्यांसाठी एका सुपर ग्लॅमरस फोटोशूटची झलक शेअर केली आहे. फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. श्वेताने तिच्या नवीन फोटोंमध्ये काळ्या रंगाची साडी घातली आहे. श्वेताकडे पाहून कोण म्हणेल की, ती 22 वर्षांची मुलगी आहे. नुकतेच श्वेताने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये श्वेता ब्लॅक कलरच्या साडीत दिसली. हे फोटो पाहून श्वेताचे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ” तुझी मुलगी आणि तु सारखेच दिसते.” श्वेता टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. यासोबतच तिने भोजपुरी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्येही काम केले आहे. श्वेता तिवारी ही दोन मुलांची आई आहे. त्यांची मुलगी पलक चित्रपटात काम करते. (Glamor photo of actress Shweta Tiwari in black saree viral on social media)
अधिक वाचा-
–Birth Anniversary: ‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से
–अश्विनी महांगडेच्या ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्री म्हणाली, “शेवटचा भाग…”