Monday, September 25, 2023

Birth Anniversary: ‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से

हिंदी चित्रपटसृष्टीत किरण बाला सचदेव यांना तबस्सुम गोविल या नावाने ओळखले जाते. 40 आणि 50 च्या दशकात त्यांनी ‘बहार’, ‘नर्गिस’ आणि ‘दीदार’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. अशात आज रविवारी (9 जुलै)ला तबस्सुम यांची जयंती आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से…

तबस्सुम यांनी फीचर फिल्मचे केले दिग्दर्शन
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी झाला. त्यांनी टॉक शो होस्ट, यूट्यूबर असण्यासोबतच पटकथा लेखनातही हात आजमावला. ‘तुम पर हम कुर्बान’ या फीचर फिल्मचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते.

तबस्सुम विजय गाेविल यांच्यासाेबत अडकल्या लग्न बंधनात
माध्यमातील वृत्तानुसार, तबस्सुमचा जन्म भारतीय स्वातंत्र्य सेनानी अयोध्यानाथ सचदेव आणि असगरी बेगम यांच्या पोटी झाला. मुंबईत वाढलेल्या तबस्सुम गोविल यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’च्या राम अरुण गोविलचा भाऊ विजय गोविल यांच्याशी लग्न केले. अभिनेत्रीच्या वडिलांनी त्यांचे नाव तबस्सुम ठेवले तर, आईने त्यांचे नाव किरण बाला सचदेव ठेवले.

बालकलाकार म्हणून चित्रपटात केले पदार्पण
अभिनेत्री जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर दिसल्या तेव्हा त्या फक्त 3 वर्षांच्या होत्या. त्यांंनी बालकलाकार म्हणून त्यांच्या चित्रपट कराकिर्दीला सुरुवात केली. तबस्सुम यांनी 1951 मध्ये नितीन बोस दिग्दर्शित ‘दीदार’ चित्रपटात नर्गिसची भूमिका साकारली होती.

हिंदी मासिकाचे 15वर्ष केले संपादन
तबस्सुम यांनी 1972 ते 1993 पर्यंत जवळपास 21 वर्षे प्रसारित झालेल्या ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या पहिल्या भारतीय टेलिव्हिजन टॉक शाेचे हाेस्ट केले. ‘गृहलक्ष्मी’ या हिंदी मासिकाचे 15 वर्षे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. तबस्सुम यांनी 1985 मध्ये ‘तुम पर हम कुर्बान’ याचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन केले, ज्यामध्ये त्यांनी जॉनी लीव्हरला विनोदी कलाकार म्हणून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणले. ( bollywood actress tabassum govil  married ramayana ram arun govil brother know unknown facts)

अधिक वाचा- 
साडीचा नखरा…अभिनेत्री आर्या आंबेकरचा पारंपरिक साज
“आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं मोठ भाष्य

हे देखील वाचा