छोट्या पडद्यावरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका तूफान गाजली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले होते. या मालिकेची कथा एका भारतीय सैनिकाच्या जीवनावर आधारीत होती. या मालिकेतील शितलचे पात्र प्रचंड गाजले. हे पात्र अभिनेत्री शिवानी बावकर हिने साकारले होते.शितलने हे पात्र साकारून घराघरात ओळख मिळवली. तिची हा मालिका 2017साली सुरू झालेली ही मालिका 2019ला संपली. शिवानीचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
शिवानीची (Shivani Bawkar) ही मालिका आता संपली आहे. त्यानंतर शिवानी ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ आणि ‘कुसुम’ या मालिकांमध्ये झळकली. तिच्या या मालिका फार काळ चालू शकल्या नाही. टिआरपी घसरल्यामुळे या मालिकांनी लवकरच निरोप घेतला. आला शिवानीच्या चाहत्यांंसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. शिवानीची आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ व ‘36 गुणी जोडी’ या दोन मालिका टिआरपी घसरल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.
आता ‘लवंगी मिरची’ (Lavangi Mirchi) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिकेला प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसादामुळे बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘लवंगी मिरची’ ही मालिका 13फेब्रुवारी 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेचा टीआरपीही कमी झाल्यामुळे झी मराठी वाहिनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यामातील वृत्तानुसार, या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग नुकतेच पार पडले आहे. ही मालिका ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बंद होणार आहे. त्या मालिकेची जागा ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री शिवानी बावकर विषयी बोलायच झाल तर, शिवानीने ‘उंडगा’ आणि ‘युथ ट्यूब’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. तिची सर्वांत गाजलेली मालिका ‘लागीर झालं जी’ ही आहे. (Actress Shivani Bawkar’s Lavangi Mirchi will bid farewell to the audience)
अधिक वाचा-
–‘हर हर महादेव…’, पुजा सावंतने शेअर केला मंदिरातील व्हिडिओ
–धक्कादायक! लोकप्रिय अभिनेत्रीला प्रवासादरम्यान अं’मली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक, मोठ्या दंडानंतर जामीन