Tuesday, September 26, 2023

धक्कादायक! लोकप्रिय अभिनेत्रीला प्रवासादरम्यान अं’मली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक, मोठ्या दंडानंतर जामीन

प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुपरमॉडेल गिगी हदीदबद्दल तर सर्वांना माहीतच असेल. गिगीचे अम्पन जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. मात्र आता तिच्याबद्दल एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. एका विमान प्रवासादरम्यान गिगी हदीदकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. यासाठी तिला अटक करण्यात आली असून सोबतच दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थात १० जुलै रोजी गिगी हदीद तिची मैत्रीण असलेल्या लिआह निकोल मॅककार्थी हिच्यासोबत विमानाने प्रवास करत होती. तिचा प्रवास संपल्यावर ती ग्रँड कॅमेनच्या ओवेन रॉबर्ट्स इंटरनेशनल एयरपोर्टवर उतरली तिथे तिच्याकडे मारिजुआना (गांजा) आढळून आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gigi Hadid (@gigihadid)

मेडियामधील रिपोर्टनुसार जेव्हा कस्टम ऑफिसर्सने गिगीचे सामान स्कॅन केले तेव्हा त्यात त्यांना मारिजुआना (गांजा) आढळून आला. त्यानंतर त्यांनी गिगीला गांजा बाळगल्या प्रकरणी आणि त्याची आयात केल्याच्या संशयाखाली अटक केली. १२ जुलैला गिगी आणि तिची मैत्रीण लिआह निकोल मॅककार्थी यांना कोर्टात दाखल केले आणि त्यांना आरोपी म्हणून सांगितले. यासाठी त्यांना १००० डॉलरची शिक्षा देण्यात आली. पुढे त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

गिगी हदीद आणि लिआह निकोल मॅककार्थी हे पाम हाइट्समध्ये थांबले होते. याचे फोटो खुद्द अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या गिगीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यातच गिगीच्या मॅनेजरने सांगितले की, “गिगी मेडिकल लायसनसोबत कायदेशीर रित्या विकत घेऊन मारिजुआना सोबत प्रवास करत जप्ती. २०१७ साली एका कायद्यानुसार ग्रँड कॅम्पेनमध्ये उपचारासाठी हे कायदेशीर आहे. तिच्याकडे याचे संपूर्ण रेकॉर्ड आहे.”

दरम्यान गिगीबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या हॉलिवूड अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियोला डेट करत आहे. बऱ्याचदा या दोघांना एकत्र बाहेर फिरताना स्पॉट केले गेले आहे. मात्र अदयाप दोघांकडून त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी गिगी याआधी गायक झेन मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

 

हे देखील वाचा