Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Suicide: 252 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते नितीन देसाई, विनोद तावडेंनी दिलेला ‘हा’ सल्ला

सिनेसृष्टीतून बुधवारी (दि. 02 ऑगस्ट) धक्कादायक बातमी समोर आली. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58व्या वर्षी आत्म’हत्या करत जगाचा निरोप घेतला. ते मुंबईतील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृत अवस्थेत आढलले. त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. अशात त्यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, नितीन देसाई (Nitin Desai) हे आर्थिक संकटाचा सामना करत होते. नितीन देसाई 252 कोटींचे कर्ज (Nitin Desai 252 Crore Loan) फेडू शकत नव्हते. वृत्तांनुसार, त्यांनी 2016 आणि 2018मध्ये ईसीएल फायनान्सकडून दोन वेळा कर्ज घेतले होते. त्यांनी 180 कोटी रुपयांच्या कर्जासाठी आपली काही जमीन गहाण ठेवली होती. त्यानंतर त्यांच्या कर्जाची रक्कम वाढून 252 कोटी रुपये झाली होती. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, काही महिन्यांपूर्वी ईसीएल फायनान्स कंपनीने एनडी स्टुडिओ (ND Studio) ताब्यात घेण्यासाठी रायगडच्या जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. या बातमीमुळे त्यांना खूपच टेन्शन आले होते. माध्यमांमध्ये असे म्हटले जात होते की, ते कर्ज वसूल करणाऱ्या कंपनीमुळे खूपच चिंतेत होते.

असे म्हटले जात आहे की, त्यांनी आर्थिक तंगीमुळे आत्म’हत्या केली आहे. खरं तर, जवळपास 15 वर्षांपूर्वी रिलायन्सने एनडी स्टुडिओचे 50 टक्के स्टेक विकत घेतले होते, पण नंतर अनिल अंबानी यांचीच कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबली. त्यामुळे एनडी स्टुडिओ जागतिक दर्जाचा बनवण्याचे देसाईंचे स्वप्नही अपूर्ण राहिले.

भाजपचे महासचिव विनोद तावडेंनी दिलेला सल्ला
देसाईंचे जवळचे मित्र आणि भाजप महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी माध्यमांना सांगितले की, “मी नेहमी त्यांच्याशी बोलायचो आणि त्यांना सल्ला द्यायचो. मी त्यांना म्हणालेलो की, अमिताभ बच्चन यांनाही मोठे नुकसान झाले होते. आणि त्यानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले होते. मी त्यांना म्हणालो होतो की, जरी स्टुडिओ कर्जाच्या ओझ्याखाली दबला असाल, पण ते नव्याने सरुवात करू शकतात. त्यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले.”

चार वेळा पटकावलेला राष्ट्रीय पुरस्कार
विशेष म्हणजे, देसाईंनी अनेक मोठ्या बजेटचे सिनेमे आणि मालिकांची निर्मिती केली आहे. ते निर्माते, कला दिग्दर्शक, सेट डिझायनर आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून जगभरात प्रसिद्ध होते. त्यांना सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी 4 वेळा राष्ट्रीय परस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे पुरस्कार त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (1999), ‘हम दिल दे चुके सनम’ (2000), ‘लगान’ (2002) आणि ‘देवदास’ (2003) या सिनेमांसाठी मिळाला होता.

तब्बल 52 एकरात पसरला आहे एनडी स्टुडिओ
रिपोर्ट्सनुसार, देसाई यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर 2005मध्ये 52 एकरात पसरलेल्या एनडी स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओमध्ये इनडोअरव्यतिरिक्त आऊटडोअर शूटिंगचेही पर्याय आहेत. शूटिंगशिवाय हा स्टुडिओ अनेक वर्षांपासून पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे. (art director nitin desai suicide exposure he had 252 crore loan on nd studio read more)

हेही वाचा-
‘तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस…’, नितीन देसाईंच्या निधनावर हळहळला सुबोध भावे
मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा