Wednesday, June 12, 2024

‘तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस…’, नितीन देसाईंच्या निधनावर हळहळला सुबोध भावे

बुधवारी (दि. 02 ऑगस्ट) प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी टोकाची भूमिका घेत आपलं आयुष्य संपवलं. 58 वर्षीय नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याच्या नावाचाही समावेश आहे. सुबोधची भावूक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सुबोध भावेची इंस्टाग्राम पोस्ट
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून नितीन देसाई (Nitin Desai) यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नितीन देसाईंसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “प्रिय नितीन, तुझा बद्दल अभिमान आदर आणि प्रेम नेहमीच होतं आणि कायम राहील. पण तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस हा प्रश्न नेहमी छळत राहील.”

सुबोधने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “ज्या तणावातून तू जात असशील असा तणाव कोणाच्याही आयुष्यात न येवो.
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. कलाक्षेत्रातील तुझी जागा कोणीच भरून काढू शकत नाही. ओम शांती.

सुबोधच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे, सायली संजीव, अक्षया नाईक यांनी हात जोडणारे इमोजी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, म्युझिक कंपोजर आणि गायक सलील कुलकर्णी यांनी हात जोडणारे आणि रडणारे इमोजी कमेंट केले आहेत.

हेही वाचा- मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा

तब्बल 20 वर्षांची कारकीर्द
नितीन देसाई यांची चित्रपट कारकीर्द एकूण 20 वर्षांची राहिली आहे. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीला 1987पासून सुरुवात झाली होती. त्यांना ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून ओळख मिळाली होती. तसेच, त्यांनी ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘माचिस’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे सेट्सही उभे केले होते. त्यांना 4 वेळा सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने, तर 3 वेळा कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हेही वाचा-
अहंकाराने बर्बाद केलेलं ‘या’ अभिनेत्याचं करिअर, मजबुरीमुळे आली ‘हे’ काम करण्याची वेळ; एकदा वाचाच
सैफच्या अमृतासोबत गुपचूप लग्नाबाबत आई शर्मिलाचा खुलासा; म्हणाली, ‘त्याने घाईघाईने…’

हे देखील वाचा