Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड सनीच्या Gadar 2चा विषयच खोल! ट्रॅक्टरमध्ये बसून चाहत्यांनी गाठलं थिएटर, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडिओ

सनीच्या Gadar 2चा विषयच खोल! ट्रॅक्टरमध्ये बसून चाहत्यांनी गाठलं थिएटर, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडिओ

सनी देओल याचा 2001 साली रिलीज झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल ‘गदर 2‘ शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) रिलीज झाला. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने 40 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, आता सिनेमाने तिसऱ्याच दिवशी 135 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासोबतच सिनेमाने शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाचाही विक्रम मोडला आहे.

‘गदर 2’ पाहण्यासाठी चाहते ट्रॅक्टर घेऊन थिएटरमध्ये
सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ सिनेमाबाबत शहरांपासून ते गावांपर्यंत लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. चाहत्यांचा उत्साह एवढा आहे की, सिनेमा पाहण्यासाठी ते मोठमोठे ट्रॅक्टर (Gadar 2 Tractor) आणि ट्रक घेऊन थिएटरमध्ये पोहोचत आहेत. यामुळे थिएटरच्या बाहेर लोकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ राजस्थानच्या झालावाड येथील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

विशेष म्हणजे, महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत दिसते की, ट्रॅक्टरमध्ये बसून चाहते ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ (Hindustan Zindabad) अशा घोषणाही देत आहेत. सनी देओलसाठी चाहत्यांमध्ये असा जोश 2001मध्येही पाहायला मिळाला होता. त्याच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Katha) या सिनेमाने तेव्हाही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

खरं तर, सनी देओलचा ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. लोकांनी 22 वर्षांनंतरही तोच उत्साह दाखवत सिनेमाचे स्वागत केले. सोशल मीडियावर चाहते या सिनेमाप्रती आपला आनंद व्यक्त करत आहेत. सिनेमाला इतका चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे सनी देओलचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना धन्यवाद दिला आहे.

काय आहे सिनेमात?
‘गदर’ (Gadar) या सिनेमात जिथे तारा सिंग (Tara Singh) बनून सनी पाकिस्तानात जातो आणि आपली पत्नी सकीनाला वाचवतो. त्यानंतर आता 22 वर्षांनंतर सनी आपला मुलगा ‘चरणजीत सिंग’ म्हणजेच उत्कर्ष शर्मा (Utkarsha Sharma) याला वाचवण्यासाठी पाकिस्तानात जातो. सध्या हा सिनेमा यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 70 ते 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 130 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. (actor sunny deol gadar 2 crazy fans reached theatres with truck and tractors see video here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘काही लोक रातोरात यशस्वी होतात, काहींना स्वत:ला सिद्ध…’, ‘OMG 2’च्या रिलीजनंतर यामीचे मोठे भाष्य
‘गदर 2’ आणि ‘जेलर’शी टक्कर होऊनही ‘OMG 2’ने रविवारी छापले ‘एवढे’ कोटी, 15 टक्क्यांनी वाढली कमाई

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा