प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याचा १७ डिसेंबर हा जन्मदिन. आज शुक्रवार रोजी रितेश त्याचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेशचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी झाला. साल २००३ मधील ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जरी कमाल नाही दाखवली, तरीही या सिनेमाने रितेशला जेनेलियाच्या रूपात त्याचे प्रेम मिळवून दिले. तब्बल ९ वर्ष चाललेली त्यांची प्रेमकहाणी बहुदा सर्वांनाच माहिती नसावी.
मराठमोळ्या रितेश आणि जेनेलिया या क्युट कपलची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटासारखीच आहे. रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली. तेव्हा जेनेलिया तिच्या आईसोबत होती. रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात खूप अॅटिट्युड असणार असे तिला वाटायचे.
https://www.instagram.com/p/CDfnpgBjFDL/?utm_source=ig_web_copy_link
मात्र, एक दिवस रितेशने पुढाकार घेतला आणि त्याने जेनेलियासोबत हातमिळवणी केली. पण तरीही जेनेलिया त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. शूटिंगच्या निमित्ताने हळू हळू ती त्याला ओळखू लागली. सेटवरच्या लोकांशी रितेशचे असलेले वागणे पाहून जेनेलियाला तो चांगला असल्याचे वाटले आणि त्यांची मैत्री झाली.
हेही वाचा – अंकिता रॉक, फॅन्स शॉक! अभिनेत्रीने परिधान केला तब्बल १६०० तासात बनलेला लेहंगा, जाणून घ्या का आहे खास?
रितेश आणि जेनेलियाच्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाचे शूटिंग हैदराबाद मध्ये पूर्ण केले आणि ते पुन्हा मुंबईत आले. मात्र रितेश आणि जेनेलिया एकमेकांना मिस करत होते. त्यामुळे त्यांनी फोनवर बोलणे सुरु केले. मग ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांना देखील नाही समजले. एवढंच काय त्यांच्यापैकी कोणी कोणाला प्रपोज केले सुद्धा त्यांना आठवत नाही.
रितेशने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याला जेनेलियाबाबत आपल्या मनात काही असल्याची भावना लगेच नाही आली. मात्र हळू हळू त्याला जेनेलिया बद्दल प्रेम वाटू लागले. रितेश आणि जेनेलिया सुमारे ९ वर्ष प्रेमात होते. त्यानंतर त्यांनी २० फेब्रुवारी २०१२ ला हिंदी आणि ख्रिश्चन पद्धतीने मुंबईत लग्न केले. आज ही दोघे दोन मुलांचे आई वडील आहेत.
अधिक वाचा –