मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. प्रार्थननुकताच आपल्या वैयक्तिक आयुष्यावरील एक अफवा सर्वांसमोर मांडली आहे.
एका व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, तिच्या नवऱ्याबद्दल अशी अफवा आहे की, तो तिला मारतो. या अफवांवर तिने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. प्रार्थनाने नुकताच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या अलिबागच्या घरातून चाहत्यांना भेट देते. यामध्ये तिला एक चाहतीने विचारले की, “अशी कोणती अफवा आहे जी, ऐकून तुला खूप हसायला आलं?”
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रार्थना ( Prarthana Behere) म्हणाली, “मला ऐकलं होतं की माझा नवरा मला मारतो. त्यावर मी आणि अभिषेक प्रचंड हसलो होतो. लोकांना अभिषेकच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून वाटत असेल की तो प्रार्थनाला मारतो पण हे सगळं खूप विनोदी आहे. तुम्हाला वाटतं की प्रार्थना बेहेरे कोणाच्या हातचा मार खाऊन घेईल?”
प्रार्थनाच्या या प्रतिक्रियेवर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी तिच्या नवऱ्याबद्दलची अफवा खोटी असल्याचं म्हटलं आहे तर काही चाहत्यांनी तिच्या नवऱ्याबद्दल प्रशंसा केली आहे. प्रार्थना बेहरे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रार्थना ‘तुझी माझी रेशीमगाठी’ मालिकेत झळकली होती. तिची या मालिकेली भूमिका चांगलीच गाजली आहे.
आधिक वाचा-
–‘एकदा येऊन तर बघा’मध्ये दिसणार वनिता खरात; आभिनेत्रीचा दाक्षिणात्य अंदाज पाहून चाहते घायाळ
–‘मराठी कलाकारांनीही लाजा सोडल्या’, प्रिया बापटचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…