Monday, December 9, 2024
Home मराठी ‘मराठी कलाकारांनीही लाजा सोडल्या’, प्रिया बापटचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

‘मराठी कलाकारांनीही लाजा सोडल्या’, प्रिया बापटचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

मराठी अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बिकिनी फोटोमुळे चर्चेत आहे. या फोटोंमध्ये प्रिया समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तिने हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अनेक लोकांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. मात्र, काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

या फोटोंमध्ये (Priya Bapat) प्रिया समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनध्ये लिहिले की, “Here’s to more ‘first times’ and owning every inch of me! One more thing off the ‘I-did-it’ list! ” तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. प्रिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लिहिले की, “यातून नेमके काय साध्य करायचे आहे? इस्रायलमधल्या बळी पडलेल्या निष्पाप महिलांना विचारा, की प्रत्येक इंचाचा अर्थ आणि महत्व काय असते ते… स्वतःच्या शरीराचा अभिमान असावा पण अतिरेक नको…शरीर सौष्ठव स्पर्धेत पण अंग दाखवतात…पण एखादा हायलाईट करणं..” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “मराठी कलाारांनी पण आता लाजा सोडल्या देह भान राहिला नाही.”

तर आणखी एकाने लिहिले की, “बाहेरील देशात गेलं की स्वतःच्या संस्कृतीला विसरूनच जातात लोक. मुळात बाहेर गेलं की बिकिनी शूट करणं हा काय प्रकार आहे? बरं चला केलं तर केलं लोकांना का दाखवता?” अशा साऱ्या कमेंटचा पाऊसच पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिका अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट, मालिका आणि नाटके केली आहेत. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. प्रियाने तिची कारकिर्द 2004 मध्ये सुरू केली. प्रियाने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील काम केले आहे.प्रियाने काही लोकप्रिय नाटकांमध्ये देखील काम केले आहे, जसे की “झाकी” आणि “जर तरची गोष्ट”. तिने या नाटकांमधील तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. (Netizens trolled famous Marathi actress Priya Bapat after seeing her bikini photos)

आधिक वाचा-
‘गडकरी’मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; एकदा वाचाच
‘एकदा येऊन तर बघा’मध्ये दिसणार वनिता खरात; आभिनेत्रीचा दाक्षिणात्य अंदाज पाहून चाहते घायाळ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा