Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड मुंबईमधील ट्रॅफिकला कंटाळून अनन्या पांडेने केला ऑटोने प्रवास, सोशल मीडियावर दाखवली व्हिडिओची झलक

मुंबईमधील ट्रॅफिकला कंटाळून अनन्या पांडेने केला ऑटोने प्रवास, सोशल मीडियावर दाखवली व्हिडिओची झलक

महागड्या आणि आरामदायी वाहनांमध्ये प्रवास करणारे बॉलिवूड स्टार सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना नेहमीच चर्चेत असतात. नुकताच हृतिक रोशन मेट्रोमध्ये दिसला. आता अलीकडेच अनन्या पांडे (ananya pandey)ऑटोने प्रवास करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अनन्या पांडे नुकतीच मुंबईत ऑटो मध्ये प्रवास करताना दिसली. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे.

अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये ती ऑटोने प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान बॅकग्राउंडमध्ये ‘जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान…’ हे गाणे वाजते. अनन्या ऑटोमध्‍ये एका मैत्रिणीसोबत दिसत आहे, मात्र व्हिडीओमध्‍ये तिने चेहरा लपवला आहे. ट्राफिक टाळण्यासाठी अनन्याने कार सोडून ऑटोने प्रवास करणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.

अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसली होती. आता लवकरच ती ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्जुन वरण सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अनन्याकडे कंट्रोल आणि शंकरासारखे प्रोजेक्ट्सही आहेत.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. याशिवाय दोघेही एकत्र सुट्ट्यांवर जाताना दिसले आहेत, परंतु अनन्या किंवा आदित्यने अजूनही याबाबत मौन सोडलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा झाले वेगळे, सोशल मीडियावर पोस्ट करून राजने दिली माहिती
पूजाचा तडक आता अनुभवी शकता ओटीटीवर, ‘या’ ठिकाणी घर बसल्या पाहू शकता ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमा

हे देखील वाचा