अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी हे वर्ष खूप खास होते. गेल्या 7 फेब्रुवारी 2023मध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. तिचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. फार कमी लोकांना माहित असेल की, कियाराला थिएटरमध्ये चित्रपट पाहणे आवडते. स्टारडम मिळवल्यानंतरही तिने हा छंद जोपासला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लोक तिला ओळखतात तेव्हा ती त्यांच्यासोबत काही सेल्फी घेते.
एका मुलाखतीदरम्यान कियारा (Kiara Advani) म्हणाली की, थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची मजा अतुलनीय आहे. एक अभिनेत्री म्हणून मला एखाद्या दृश्यादरम्यान टाळ्या वाजवायला किंवा भावनिक दृश्यादरम्यान उघड्या तोंडाने पाहणे आवडते. मला थिएटरमध्ये बसून पॉपकॉर्नसह चित्रपट पाहणे आवडते. शेवटी, चित्रपटगृहात अनेक वर्षे चित्रपट पाहिल्यामुळे मला अभिनेत्री बनण्याची इच्छा निर्माण झाली. हीच तर चित्रपटांची जादू आहे.
आगामी काळात कियारा ‘गेम चेंजर’ या पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. मूळ तेलगू भाषेत बनवलेल्या या चित्रपटात ती अभिनेता राम चरणसोबत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा भरपूर अॅक्शन करताना दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत ती म्हणते की, ती सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. ती अशा शैलीतील चित्रपट करत आहे. ज्यात तिने यापूर्वी हात आजमावला नाही.
कियाराच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, कियारा अडवाणीने ‘कबीर सिंग’, ‘शेरशाह’,’भूल भुलैया 2′ आणि ‘दिल बेचारा’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. कियाराने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Kiara Advani will be seen doing a strong performance in the movie Game Changer)
आधिक वाचा-
–आलिया सोबत लग्न केल्याचा रणबीरला होतोय पश्चात्ताप, ‘या’ सौंदर्यवतीवर त्याचं खरं प्रेम? म्हणाला…
–निया शर्माच्या बोल्ड फोटोवर चाहते झाले फिदा पण भयानक कॅप्शनने वाढवली चिंता; म्हणतेय, ‘अंदाज लावा…’










