Monday, October 2, 2023

जेव्हा टॉपलेस फोटोने उडवली खळबळ, आतापर्यंत बऱ्याच वादांमध्ये अडकलीय कियारा अडवाणी

अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. तिची बबली आणि बोल्ड स्टाइल चाहत्यांना आवडते. कियाराने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूड’, ‘जुग जुग जिओ’ आणि ‘भूल भुलैया २’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. कियारासाठी आजचा दिवस खास आहे, कारण ती आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. कियारा तिच्या शॉर्ट फिल्म करिअरमध्ये अनेकदा वादातही सापडली आहे. तिच्याशी संबंधित वादांबद्दल जाणून घेऊया.

‘लस्ट स्टोरीज’मधील बोल्ड सीन
जेव्हा वेब सिरीज ‘लस्ट स्टोरीज’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाली, तेव्हा कियारा अडवाणी चर्चेचा विषय बनली. या वेब सीरिजच्या इंटिमेट सीनमुळे कियाराला खूप प्रसिद्धी मिळाली. यावरून सोशल मीडियावर तिच्यावर मीम्स बनवण्यात आले. कियाराला एका सीनसाठी ट्रोलही करण्यात आलं होतं. (know about bollywood actress kiara all controversies)

‘इंदू की जवानी’वरून वाद
कियाराने ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट साइन केला, तेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) बहीणीने कियारा हिच्यावर जोरदार टीका केली होती. खरं तर, कंगनाच्या बहिणीचे म्हणणे होते की, एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या चर्चा होत असताना, कियारा ‘इंदू की जवानी’ सारखा चित्रपट कसा साईन करू शकते?

टॉपलेस फोटोने उडवली खळबळ
कियारा अडवाणी चर्चेत आली, जेव्हा तिने टॉपलेस फोटोशूट केले. त्या फोटोमध्ये कियारा तिचे शरीर फक्त एका पानाने झाकलेली दिसत होती. यानंतर सोशल मीडिया यूजर्सने तिला जोरदार ट्रोल केले. मात्र, तिचे फोटोशूट खूप व्हायरल झाले. कियाराचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी केले होते.

‘कबीर सिंग’वर वाद
‘कबीर सिंग’ चित्रपटातील एका सीनमध्ये अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) कियारा अडवाणीला चापट मारली. तिच्या चाहत्यांना हा सीन आवडला नसल्याने, या सीनवर बराच गदारोळ झाला होता. यासोबतच समीक्षकांनीही या सीनवर टीका केली होती.

अधिक वाचा- 
जाळ अन् धूर संगटच! भाग्यश्रीच्या फोटोंनी पुन्हा केले चाहत्यांना घायाळ
धमाल-मस्ती, हॉट लूक, अन्…; सईचे फोटोशूट चर्चेत

हे देखील वाचा