Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘झी मराठी अवॉर्ड्स’च्या मंचावर माधुरी दीक्षितने लावले जोरदार ठुमके; डान्सने चोरली चाहत्यांची मने

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. माधुरीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी अनेकदा तिच्या नृत्याने सर्वांना भूरळ घालते. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतेच ‘झी मराठी पुरस्कार सोहळ्या’ला हजेरी लावली. या सोहळ्यात तिने तिच्या लोकप्रिय गाण्यांवर जबरदस्त डान्स करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) हिरव्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. तिने गळ्यात सुंदर नेकलेस आणि नाकात नथ घातली होती. तिचा हा मराठमोळा लूक सर्वांनाच आवडला. सोहळ्यात माधुरी दीक्षितने तिच्या काही लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला. माधुरी दीक्षितला तिच्या डान्ससाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती आजही तिच्या डान्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

2013मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने ‘घागरा’ या गाण्यासाठी कॅमिओ केलेला. माधुरी आणि रणबीर कपूरवर चित्रित झालेलं घागरा हे गाणं आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. याच घागरा गाण्यावर माधुरीने ‘झी मराठी अवॉर्ड्स’च्या रंगमंचावर ठिमके लावले.

हा व्हिडिओ शेअर करताना वर्षा दांदळे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती आली.. तिने पाहिलं.. तिने जिंकलं.. माधुरी दीक्षित साक्षात तिच्या सोबत dance म्हणजे दुधात साखर..धन्यवाद झी मराठी.” त्यावेळी ‘नवा गडी नवं राज्य’ फेम अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्यासोबत माधुरीने डान्स केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Dandale (@varshadandale)

माधुरीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिचा हा व्हिजिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “वाह वाह क्या बात है”, दुसऱ्याने लिहिले की, “माधुरीच्या अदा”त तर आणखी एकाने लिहिले की, “खूप सुंदर क्षण” (Madhuri Dixit performed a stunning dance at Zee Marathi Awards)

आधिक वाचा-
‘राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’च्या कमाईत मोठी घट, 16व्या दिवशीचे कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा