बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिची स्टायलिश आणि ट्रेंडी ड्रेसिंग नेहमीच चर्चेत असते. सोनम कपूरने आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये करण्यास सुरुवात केली होती. तिने पारंपारिक भारतीय पोशाख, वेस्टर्न ड्रेसेस आणि कॉकटेल ड्रेसेस या सर्व प्रकारच्या पोशाखांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. सोनम कपूरने अनेकदा रॅम्प वॉक देखील केला आहे आणि तिची स्टाइल नेहमीच कौतुकास पात्र ठरली आहे.
सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) फॅशन सेन्सचे अनेक चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या फॅशन सेन्सवर अनेक पोस्ट आणि कमेंट्स केल्या जातात. सोनम कपूरने आपल्या फॅशन सेन्सद्वारे अनेक तरुण मुलींना प्रेरणा दिली आहे. सोनम कपूरची फॅशन सेन्स कायम चर्चेत राहते. तिच्या नवीनतम फॅशन अपडेट्ससाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
सोनम नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. सोनम कपूर रविवारी एका फॅशन शोचा भाग बनली. जिथे तिने रॅम्प वॉक केला, पण फॅशन क्वीनचा हा रॅम्प वॉक लोकांना फारसा आवडला नाही आणि तिला खूप ट्रोल केले जात आहे. सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री तिचा मुलगा वायुसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने रविवारी म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी एका फॅशन शोमध्ये भाग घेतला.
View this post on Instagram
यादरम्यान सोनमने ऑफ व्हाइट कलरच्या शिमरी लेहेंग्यात दिसली. या लेहेंग्यात सोनम सुंदर दिसत होती, पण रॅम्पवर चालणे लोकांना आवडले नाही, त्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. सोनम कपूरने तब्बल ४ वर्षांनंतर रॅम्प वॉक केला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोनमचा हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप हळू चालताना दिसत आहे. सोनमचे असे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले, तु पार्कमध्ये फिरत आहे का? आणखी एका यूजरने लिहिले की, सोनमने कंगनाकडून रॅम्प वॉक शिकावे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, जेव्हा तुम्हाला रॅम्पवर कसे चालायचे हेच कळत नाही, तर तुम्ही असे का करता? तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Netizens trolled Sonam Kapoor who was seen walking the ramp wearing a lehenga after 4 years)
आधिक वाचा-
–प्रकाश राज यांनी कंगना रणौतची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘भारताला 2014मध्ये स्वातंत्र्य मिळालं…’
–तारा सुतारियाच्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर लावली आग; नेटकरी म्हणाले, ‘तू खूप…’










