Tuesday, May 28, 2024

युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या रिसेप्शनसाठी सोनम कपूरचा गाॅर्जियस लूक, फ्लाेरल साडीत लावले चार चांद

बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर युके इंडिया वीक सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. 10 डाउनिंग स्ट्रीट येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये ती सर्वात मोठी स्टनर होती, ज्याचे फाेटाे बुधवारी (29 जुन)च्या संध्याकाळपासून साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या फाेटाेंवर केवळ चाहतेच नव्हे, तर प्रसिद्ध कलाकारही लाईक आणि कमेंट्स करून अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अशात इन्स्टाग्रामवर बुधवारी (29 जुन)च्या संध्याकाळपासूनचे फाेटाे शेअर करत सोनम कपूर (sonam kapoor ) हिने लिहिले, “युके इंडिया वीक साजरा करण्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीट येथे रिसेप्शनसाठी रोहितबालॉफिशियलचे प्रतिनिधित्व करत आहे. लंडनच्या उन्हाळ्यात मला साडी नेसायला मिळाली, याचा मला खुप आनंद झाला.”

आनंद आहुजाने पत्नी साेनमच्या पोस्टवर हार्ट इमाेजी टाकत प्रतिक्रिया दिली. यासाेबत चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या पाेस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “अरे देवा! किती सुंदर”, तर अनेकांनी तिला “सुंदर” आणि “स्टनिंग” म्हटले आहे. अशात एकाने कमेंटमध्ये असेही लिहिले आहे की, “एकदम सुंदर”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

हे रिसेप्शन यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे अधिकृत निवासस्थान आणि 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. हा 26 ते 30 जून दरम्यान लंडनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया ग्लोबल फोरमच्या युके-इंडिया वीकचा एक भाग आहे. राजकारण, व्यापार, व्यवसाय, शाश्वतता, समावेशन यासह महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम आहे, जाे येत्या आठवडाभर चालेल.

नुकताच सोनमच्या कमबॅक चित्रपट ‘ब्लाइंड’चा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सोनमने एका पोलिस महिलेची भूमिका केली आहे, जी ब्लाइंड असूनही सीरियल किलरचा पाठलाग करते. शोम माखिजा दिग्दर्शित ‘ब्लाइंड’मध्ये पूरब कोहली, विनय पाठक, लिलेट दुबे आणि शुभम सराफ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2011च्या त्याच नावाच्या कोरियन क्राईम थ्रिलरचा बॉलीवूड रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन आह संग-हुन यांनी केले आहे.(bollywood actress sonam kapoor gorgeous look for uk pm rishi sunak reception in floral saree)

अधिक वाचा-
कियाराला उप्स मोमेंटपासून वाचवण्यासाठी कार्तिकने केले ‘हे’ कृत्य, व्हिडिओ एकदा पाहाच
केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

हे देखील वाचा