प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने आत्तापर्यत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा 1995 मध्ये आलेल्या ‘रंगीला’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अभिनेत्री शेफाली शाह देखील झळकळी होती. शेफाली शाहने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली. 28 वर्षात तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत. मात्र, आता ती ओटीटी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 50 वर्षांची शेफाली ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.
2005 मध्ये रिलीज झालेल्या एका चित्रपटात शेफालीने अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आईची भूमिका साकारली होती. तर ती अक्षयपेक्षा 6 वर्षांनी लहान होती. ही भूमिका साकारल्यानंतर बर्याच दिवसांनी शेफालीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.1998मध्ये आलेल्या ‘सत्या’ चित्रपटासाठी शेफालीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. शेफालीने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘गांधी माय फादर’, ‘मोहब्बतें’, ‘मान्सून वेडिंग’, ‘दिल धडकने दो’, ‘ब्रदर्स’, ‘द जंगल बुक’ आणि ‘कमांडो 2’, ‘ब्लॅक अँड व्हाइट’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘लक्ष्मी’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘डार्लिंग्स’. ‘ह्यूमन’, ‘जलसा’ आणि ‘दिल्ली क्राइम’ यांसारख्या मालिकांमधून तिने अनेक वेगवेगळ्या भुमिका साकारल्या.
दरम्यान, त्याच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ चित्रपट आठवला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल शेफालीने बातचीत केली. यावेळी ती म्हणाली की, “या भूमिकेसाठी मला खूप वाईट वाटत आहे. ती पुन्हा अशी भूमिका करणार नाही.” या चित्रपटात अक्षय कुमारच्या ऑन-स्क्रीन आईची भूमिका साकारण्यामागे तिचे स्वतःचे कारण होते. मात्र, यावेळी तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मी माझ्या आयुष्यात अक्षय कुमारच्या आईची भूमिका कधीच साकारणार नाही’. शेफालीच्या बोलण्यावरून नेटिझन्सचा अंदाज आहे की तिला हा चित्रपट केल्याचा पश्चाताप होत आहे.
शेफाली म्हणाली, “मला खूप छान लोकांसोबत काम करायला मजा आली. मी असे म्हणत नाही कारण हे राजकीयदृष्ट्या योग्य आहे, परंतु प्रत्यक्षात मी खूप उत्साही असलेल्या दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत काम केले आहे. पण, कलाकार हा केवळ अभिनेता नसतो, तर सहकारी असतो, असे मानणाऱ्या दिग्दर्शकांसोबतही मी काम केले आहे.” (Actress Shefali Shah regrets playing the role of Akshay Kumar mother in the film Rangeela)
आधिक वाचा-
–‘मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…’, मराठी दिग्दर्शकाने केलेलं ‘ते’ ट्वीट व्हायरल
–42व्या वर्षी शमा सिकंदरने मोनोकिनी परिधान करून घातला धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, ‘व्वा एकदम …’