Sunday, April 14, 2024

अरे बापरे! विद्या बालनला घाबरून अक्षय कुमारच्या मुलाचा उडायचा थरकाप; जाणून घ्या कारण

बॉलिवूडमध्ये अनेक हॉरर चित्रपट आजवर तुम्ही पाहिले असतील. यामध्ये दाखवणारे सीन हे अगदी चित्तथरारक असतात. अशात 12 ऑक्टोबर, 2007मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन अभिनित ‘भूल भुलैया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला त्यावेळी प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. पुढल्या वर्षी म्हणजेच साल 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगवेळी अथवा त्यानंतरचे काही मजेशीर किस्से असतात. या चित्रपटाचे देखील काही मजेशीर किस्से आहेत.

विद्या बालनने आज सिनेसृष्टीमध्ये यशाचे शिखर गाठले आहे. अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट देण्यास ती सज्ज झाली आहे. ‘भूल भुलैया’ चित्रपटामध्ये देखील तिने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची बोलतीच बंद केली होती. या चित्रपटातील भूतआत्मा असलेल्या मोंजोलिकाची भूमिका तिने जीव ओतून साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचे विशेष कौतुक झाले होते.

अशात एका मुलाखतीमध्ये तिने या चित्रपटाशी जोडलेले काही किस्से सांगितले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, “अक्षयचा मुलगा आरव मला खूप घाबरायचा. खरंच हे माझ्यासाठी खूप मजेशीर होते. कारण लोक मला माझ्या नावाने नाही, तर मोंजोलिका म्हणून ओळखू लागले होते, आणि ते मला घाबरतही होते.”

म्हणून आरव विद्या बालनला घाबरायचा
पुढे आणखीन एक किस्सा सांगत ती म्हणाली होती की, “अक्षयची पत्नी ट्विंकलने मला एकदा आरव बद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, आरव एकदा मस्त गाणी लावून नाचत होता. त्यावेळी अचानक त्याला तुझ्या गाण्याची आठवण आली आणि तो खूप घाबरला. तो धावत माझ्याकडे आला, तेव्हा तो भीतीने घामाघूम झाला होता. ”

पुरस्कार न मिळाल्यामुळे विद्या झाली होती हताश
विद्या बालनने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. परंतु तिला पुरस्कार न मिळाल्याने ती खूप नाराज झाली होती. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “मला आशा होती की, या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळेल, पण मला नॉमिनेशन न मिळाल्याने मी हताश झाले होते. कारण या चित्रपटामध्ये केलेल्या माझ्या अभिनयाचे प्रत्येकाने कौतुक केले होते. मला खूप दुःख झाले होते. त्यानंतर मग मी विचार केला हा सर्व आयुष्यातील एक भाग आहे.”

या चित्रपटाला आता १४ वर्षे पूर्ण झाल्यामुळे टी-सीरिज याचा पुढील भाग बनवत आहे. यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तब्बू देखील चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये कार्तिक अक्षयप्रमाणे वेशभूषा केलेला दिसला. ‘भूल भुलैया 2′ साल 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सर्व सिनेचाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही नक्की वाचा-
‘माझे हिरो, आयकॉन…’रितेश देशमुखची ‘बिग बीं’साठी खास पोस्ट; जुना फोटो व्हायरल
जेव्हा लीक झाले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो, तर ‘या’ कारणामुळे केलं होतं अभिनेत्रीने धर्मपरिवर्तन

हे देखील वाचा