स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका खुप लोकप्रिय आहे. मालिकेतील विषय अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असून देखील लेखकाने या विषयाची मांडणी अगदी उत्तमरीतीने मांडली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्रतील प्रेक्षकांच्या मनावप आधिराज्य गाजत आहे. प्रत्येक पात्राला खास अशी ओळख मिळत आहे आणि हीच या मालिकेची खासियत आहे की, प्रत्येक पात्राला एक विशिष्ट दर्जा आहे. यातील अरुंधती देशमुखचे पात्र चांगलेच चर्चेत आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अरुंधती देशमुख ही एक निर्भीड, करारी आणि जिद्दी स्त्री आहे. तिच्या या व्यक्तिमत्त्वामुळे तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. अरुंधती या मुख्य पात्राची दमदार भूमिका मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
मधुराणीने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे लाखो चाहते आहेत. मधुराणीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत तिचा नेहमीपेक्षा वेगळा लूक दिसत आहे. तिने केस रिकामे सोडले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक दिसून येत आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, “न्यू हेअर कट स्माईल तो बनता है”
मधुराणीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. कमेंट करताना एकाने लिहिले की, “खुप भारी दिसत तू दीदी.” दुसऱ्याने लिहिले की, “सुंदर! आई कुठे काय करते मध्ये पण हाच look दाखवला पाहिजे…” याशिवाय “खूप गोड दिसते आहेस…” असं सुकन्या मोनेंनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
मधुराणीने याआधी देखील अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु या मालिकेने आणि आई या पात्राने तिला प्रचंड ओळख निर्माण केली आहे. तिच्या अरुंधती या पात्राला खूप ओळख मिळत आहे. याआधी तिने ‘सुंदर माझं घर’, ‘गोड गुपित’, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. (Madhurani Prabhulkar fame latest look)
आधिक वाचा-
–जॅकलीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमध्ये झळकणार अभिनेत्री
–किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट; म्हणाले, ‘सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस…’