Sunday, May 19, 2024

जॅकलीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमध्ये झळकणार अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे लोखो चाहते आहेत. जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत येते. सध्या जॅकलिन फर्नांडिस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन फर्नांडिस लवकरच डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. ती जिओ सिनेमाच्या एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिने ‘मर्डर 2’, ‘किक’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दिलबर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती डिजिटल क्षेत्रात पदार्पण करून प्रेक्षकांवर आपले कौशल्य दाखवणार आहे. चित्रपटांमधील तिच्या स्टारडमवर आधारित प्रकल्प बनवण्याबरोबरच अनेक कलाकार त्यांच्या कलेचे विविध पैलू सादर करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. आता ‘मर्डर 2’ आणिचित्रपटांची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नावही या यादीत जोडले जाणार आहे.

राम सेतू दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांच्या वेब सीरिजसह जॅकलीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे. या शोशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोमध्ये जॅकलिनसोबत अभिनेता नील नितीन मुकेशची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जिओ सिनेमासाठी तयार करण्यात येत असलेल्या शोचे नाव GOAT (ग्रेटेस्ट ऑफ आल टाइम) असे आहे. या शोसाठी जॅकलिन निर्मात्यांची पहिली पसंती होती.

ती तिच्या पहिल्या वेब सीरिजबद्दलही खूप उत्सुक आहे. या शोची कथा आणि पार्श्वभूमी याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. या शोचे शूटिंग प्रामुख्याने मुंबईतच होणार आहे. पुढील चार महिन्यांत हा शो मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार शूट केला जाणार आहे. याशिवाय जॅकलिन येत्या काही दिवसांत फतेह, हाऊसफुल 5 आणि वेलकम टू द जंगल या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (bollywood Famous actress jacqueline fernandez will debut on digital platform with neil nitin mukesh in jio cinema web series)

आधिक वाचा-
‘त्यांना क्रिकेटची काय समज असेल..’ हरभजन सिंगने अनुष्का आणि अथियावर केलेली कमेंट पडली महागात
‘गोष्टी चांगल्या होतील, तुमचा अभिमान आहे…’, टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवावर बिग बींची प्रतिक्रिया

हे देखील वाचा