Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड बॉबी देओलने अॅनिमलमधील त्याच्या पात्राला म्हटले रोमँटिक; म्हणाला, ‘मी स्वत:ला खलनायक म्हणून पाहत नाही’

बॉबी देओलने अॅनिमलमधील त्याच्या पात्राला म्हटले रोमँटिक; म्हणाला, ‘मी स्वत:ला खलनायक म्हणून पाहत नाही’

संदीप रेड्डी वंगा यांच्या अलीकडच्या अॅनिमल या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यासोबतच हा चित्रपट अनेक विक्रम मोडत आहे.

अलीकडेच या चित्रपटात अबरार ही नकारात्मक भूमिका 15 मिनिटांसाठी साकारणाऱ्या बॉबी देओलने खुलासा केला की, ‘त्याने स्वत:ला चित्रपटाचा खलनायक म्हणून कधीच पाहिले नाही’. बॉबी देओलने जोर दिला की त्याचे पात्र ‘अबरार’ हे कौटुंबिक आहे.

एका मुलाखतीत बॉबी देओलने अॅनिमलमधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी या चित्रपटात स्वत:ला खलनायक म्हणून पाहिले नाही कारण अबरारने त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे आजोबा गमावले, जो स्वत: ला जाळून घेतो आणि हा धक्का त्याचा आवाज हिरावून घेतो. . म्हणून तो शपथ घेतो की तो त्याच्या आजोबांच्या मृत्यूचा बदला घेईल आणि तो खूप कौटुंबिक माणूस आहे. तो रोमँटिक आहे’.

अभिनेत्याने सांगितले की, ‘त्याच्या व्यक्तिरेखेला तीन बायका आहेत आणि तो आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतो, त्यांच्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे’. रणबीर कपूरच्या या सिनेमाची क्रेझ वाढली आहे.

अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड तोडत आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे, पण चित्रपटगृहांमध्ये त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत असून चांगल्या नफा कमवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘भूल भुलैया 3’ मध्ये एक्स गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करणार कार्तिक आर्यन, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
बहिणीच्या कॉन्सर्टमध्ये सान्या मल्होत्राने केला जोरदार डान्स, चेन्नई एक्सप्रेसच्या गाण्यावर लावले ठुमके

हे देखील वाचा