Thursday, January 15, 2026
Home अन्य ‘मला पॉर्न बघायला आवडतं पण…’, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा उल्लेख करत ‘या’ अभिनेत्याने केल धक्कादायक विधान

‘मला पॉर्न बघायला आवडतं पण…’, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा उल्लेख करत ‘या’ अभिनेत्याने केल धक्कादायक विधान

अभिनेता अर्शद वारसीने काही दिवसांपूर्वी संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल‘ (Animal)’ चित्रपटाचे कौतुक केले होते. आता त्याने या चित्रपटाची तुलना पॉर्नशी केली आहे. खरं तर, ‘अ‍ॅनिमल‘ रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटावर हिंसेचा गौरव केल्याचा आरोप केला जात असून त्याला महिलाविरोधीही असल्याचे म्हटले जात आहे. या वादात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीन चर्चेत आहे.

अर्शद वारसी म्हणाला की, मला ‘अ‍ॅनिमल‘ खूप आवडतो, परंतु अशा चित्रपटांचा भाग बनण्याची माझी इच्छा नाही. याचे कारणही म्हणजे, मी तो चित्रपट करू शकत नाही. जसं मला पॉर्न बघायला आवडतं पण त्यात काम करायला नाही, अगदी तशीच ही गोष्ट आहे.

अर्शद वारसी पुढे म्हणाला, ‘अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहायला आवडतात पण करायला आवडत नाहीत. जेव्हा इंद्र कुमारने मला ‘ग्रँड मस्ती’ कराण्याची ऑफर दिली होती. पण मी त्याला नकार दिला. मला अशा प्रकारचे चित्रपट आवडत नाहीत. मला सेक्स कॉमेडी आवडत नाही. मला ते बघायला हरकत नाही, मजा आहे, पण मला ते करायचे नाही. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून मला ते बघायला आवडतं, पण एक अभिनेता म्हणून मला तसं करायचं नाही. मला पॉर्न आवडते, पण मला त्यात काम करायचे नाही.

अ‍ॅनिमल विषयी बोलायच झाल तर, रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाल करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच जगभरात 100 कोटींचा टप्पा गाठला होता. चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 800 कोटींहून अधिक तर भारतातb500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे.

चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराच्याभोवती फिरते. रणबीर कपूर या चित्रपटात एका खतरनाक गुन्हेगाराची भूमिका साकारत आहेत. (Actor Arshad Warsi made a shocking statement while mentioning the movie Animal)

आधिक वाचा-
2023 मध्ये बॉलिवूड ‘या’ कलाकारांनी घेतले स्वतःचे घर, वाचा यादी
शाहिद कपूरच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज कारची एंट्री, एवढी आहे किम्मत

हे देखील वाचा