Friday, January 16, 2026
Home कॅलेंडर सैफच्या नव्याकोऱ्या ‘तांडव’ वेबसिरीजचा टिझर प्रदर्शित, नवाबच्या लूक्स आणि अंदाजामुळे सर्वत्र चर्चा

सैफच्या नव्याकोऱ्या ‘तांडव’ वेबसिरीजचा टिझर प्रदर्शित, नवाबच्या लूक्स आणि अंदाजामुळे सर्वत्र चर्चा

ह्यावर्षी कोरोनाने आपल्या देशात एन्ट्री घेतली आणि आपले संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सार्वजनिक जीवनात आपल्याला खूप मर्यादा आल्या, किंबहुना आपल्याला ह्यावर्षी सार्वजानिक जीवन जगतच आले नाही. घरच्या चार भिंतींमध्ये आपल्याला नाईलाजास्तव अडकावे लागले.

कोरोनाने अनेक क्षेत्रातल्या कामांना फटका बसत असतानाच ओटीटी प्लॅटफॉर्मला मात्र सुगीचे दिवस आले. या कोरोना काळात ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रदर्शित झाल्या. यात आता सैफ अली खानची देखील भर पडत आहे. सैफची ‘तांडव’ ही वेबसिरीज पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तांडव’ या वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

‘तांडव’ वेबसिरीजची कथा भारतीय राजकारणावर आधारित आहे. टिझर वरून ही वेबसिरीज राजकारण आणि त्यात होणाऱ्या कटकारस्थानावर असणार आहे. याआधी अनेक सिनेमे, वेबसिरीज राजकारणावर आधारित आल्या आहेत. मात्र ‘तांडव’ ही वेबसिरीज नक्कीच यासर्वांपेक्षा वेगळी असणार यात शंका नाही. एक मिनिटाच्या या टीझरमध्ये फक्त एकच दमदार डायलॉग आहे. ‘इस देश में जो प्रधानमंत्री है, वही राजा है’ ह्या डायलॉगवरूनच ही वेबसिरीज किती जबरदस्त असणार आहे याचा अंदाज येतो. या टिझरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सैफचा अंदाज, त्याचा लुक आणि त्याचा अटीट्युड. सैफच्या फॅन्ससाठी ही वेबसिरीज म्हणजे पर्वणीच आहे.

अली अब्बास जफरच्या या सिरीज मध्ये सैफ सोबतच डिंपल कपाड़िया, सुनील ग्रोवल, गौहर खान, अनूप सोनी जीशान अयूब, डिनो मोरिया, तिग्मांशु धूलिया, कुमुद मिश्रा, कृतिका कामरा, सारा जेन डायस, परेश पाहुजा आदी कलाकारांच्या भूमिका असणार आहे.
येत्या १५ जानेवारीपासून ही वेबसिरीज अमेझॉन प्राईम वर बघता येणार आहे.

हे देखील वाचा