समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत आहेत.
मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार. पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांकडे झेप घेणारी ही ‘कन्नी’ ८ मार्चलाला प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” ज्याप्रमाणे ‘कन्नी’ जशी पतंगाला बांधून ठेवते तशीच ही कन्नी सुद्धा मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी आहे. सर्व वयोगटाला आवडेल असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात धमाल आहे, इमोशन्स आहेत. हे सगळे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ची सफर, पाहा चित्रपटाचे नवीन गाणे
‘कदाचित मी तितकी लोकप्रिय नाही…’, मृणाल ठाकूरचा बॉलीवूडला टोला!