चंद्रचूड सिंग हा बॉलीवूडमधील असा एक अभिनेता आहे, ज्याने अनेक सिनेमांत काम केले परंतू अपेक्षित यश मिळाले नाही. त्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले तसेच अनेक शानदार सिनेमांत कामही केलं. चंद्रचूडचा जन्म ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला. त्याबद्दल आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
चंद्रचूड सिंगने पहिला सिनेमा थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केला. सिनेमाचे नाव होते तेरे मेरे सपने. खुद्ध अमिताभ बच्चनच या सिनेमाचे निर्माता होते. १९९६ साली आलेल्या या सिनेमाने तेव्हा विशेष अशी कमाई केली नाही. त्यानंतर चंद्रचूडने अभिनेत्री तब्बूसोबत माचिस मध्ये भूमिका निभावली. हा सिनेमा पुढे चांगला हिट झाला.
त्यानंतर चंद्रचूडने दाग- द फायर, जोश व क्या कहना सारखे सिनेमा केले. त्यानंतर काही चांगले सिनेमा दिलेला हा अभिनेता आपोआप मागे पडला. “मला काहीतरी वेगळं करायचं होतं. वेगळे चित्रपट करायचे होते. मला अनेक चांगल्या ऑफरही आल्या होत्या. परंतू वेगळ्या भूमिका हव्या असल्याने मी बऱ्याच भुमिका नाकारल्या,” असे चंद्रचूडने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
जवळपास १२ सिनेमे केल्यानंतर हा अभिनेता चित्रपट सृष्टीतून गायब झाला. त्याचबरोबर त्यालाही चित्रपटात काम मिळणे बंद झालं. २००० साली चंद्रचूडचा एक भीषण अपघात झाला. तो तेव्हा गोव्यात बोट रायडिंग करत होता. तेव्हाच हा अपघात झाला व तो यात चांगलाच जखमी झाला. त्यानंतर मात्र त्याच्या कारकिर्दीत विशेष काही घडले नाही. या अपघातातून सावरायला चंद्रचूडला १० वर्ष लागले. त्यानंतर चार दिन की चॉंदनी सिनेमात त्याने कमबॅक केले. परंतू हा सिनेमा फ्लॉप ठरला. याचबरोबर या ताऱ्याने क्लासिकल संगितातही महारथ हासिल केले.
“गोव्यातील अपघातामुळे माझे जीवन अधिक कठीण झाले. खूप संकट आली. परंतू माझी बायको व मुलगा यांनी मला कठीण काळात चांगली साथ दिली,” असे तो एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.
आता चंद्रचूडने वेब सिरीजकडे आपला मोर्चा वळवला आहे. आर्या नावाच्या वेब सिरीजमध्ये तो सुश्मिता सेनबरोबर दिसला. सुश्मितानेही याच वेबसिरीज द्वारे कमबॅक केले.
हेही वाचा —-
व्यायाम तर केलाच पाहिजे! अमिताभ यांच्यापासून ते करीनापर्यंत ‘या’ कलाकारांनी घरातच बनवलीये जिम
पहिलं को-स्टारवर प्रेम, नंतर प्रसिद्ध मॉडेलवर फिदा झाला करण कुंद्रा; वाचा त्याच्या आयुष्यातील रोचक किस्से
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे










