Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड मोठी कामगिरी! प्रियांका चोप्राने कोव्हिड- १९ फंडरेजरमध्ये २४ तासातच जमवले तब्बल ‘इतके’ कोटी, तुम्हालाही वाटेल अभिमान

मोठी कामगिरी! प्रियांका चोप्राने कोव्हिड- १९ फंडरेजरमध्ये २४ तासातच जमवले तब्बल ‘इतके’ कोटी, तुम्हालाही वाटेल अभिमान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू खूप वेगाने संक्रमण करत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या लाखोंमध्ये वाढत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देत आहेत. तरीही नागरिकांनी सगळ्या सूचनांचे पालन न केल्याने आता महाराष्ट्र सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जात आहे. सरकारसोबत अनेकजण देशाला या संकटातून वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे.

अशातच ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे देखील भारताला या संकटात मदत करण्यासाठी पुढे आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रियांकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती तिच्या फॉलोवर्सला भारताला मदत करण्याची विनंती करत होती.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने भारताला मदत करण्यासाठी एका फंडरेजरची माहिती दिली आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत जगभरातील तिच्या चाहत्यांना मदत करण्यासाठी विनंती करत आहे. खास गोष्ट म्हणजे केवळ 24 तासातच या फंडरेजरमध्ये जवळपास 2 कोटी 87 लाख एवढी रक्कम जमा झाली आहे. या गोष्टीची माहिती स्वतः प्रियांका चोप्राने दिली आहे.

प्रियांका चोप्राने व्हिडिओ शेअर करून भारताला ज्यांनी मदत केली आहे त्यांचे मनापासून आभार मानले आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले आहे की, “टूगेदर फॉर इंडिया. तुम्ही सगळ्यांनी केलेली मदत, सपोर्ट आणि डोनेशनसाठी खूप खूप धन्यवाद!! तुम्ही सगळ्यांनी केलेली ही मदत भारताला कोरोना संकटातून बाहेर आणण्यासाठी नक्कीच मदत करेल. अजून खूप काही करायचे बाकी आहे. आपण ज्या गतीने सुरुवात करत आहोत, त्या गतीने नक्कीच पुढे जाऊ. कृपया डोनेट करा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा