×

‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतील हुशार अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने तिच्या दमदार अभिनयाने आणि तिच्या स्टाईलने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. शनिवारी (१ मे) अनुष्का वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म सन १९८८ साली अयोध्यामध्ये झाला होता. सन 2014 साली तिच्या चेहऱ्यात झालेल्या बदलामुळे ती सर्वत्र चर्चेत होती. ‘पीके’ या चित्रपटात तिचे ओठ वेगळेच दिसत होते. तसेच करणच्या चॅट शोमध्ये देखील तिच्या ओठांचा आकार वेगळा दिसत होता. या बाबतीत प्रेक्षकांनी तिला प्रश्न देखील विचारले होते. त्यानंतर काही दिवसांतच इंडस्ट्रीमध्ये अनुष्काने तिच्या ओठांची सर्जरी केली आहे, अशी बातमी पसरली होती. त्यानंतर अनुष्काने प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. आज यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या ओठांच्या सर्जरीवर दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत…

अनुष्काने आपल्या ओठांबाबत बोलताना सांगितले होते की, ‘तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी चित्रपटासाठी लिप इनहान्सिंग टूलचा वापर केला आहे.’

अनुष्काने 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “लिप जॉब या संकल्पनेचा तिने स्वीकार केला होता. परंतु त्यावेळी तिने कोणत्याही सर्जिकल उपचाराची गोष्ट सांगितली नव्हती.”

अनुष्काला तिच्या सर्जरीबद्दल विचारल्यानंतर अशा गोष्टींना तिने नकार दिला होता. तिने सांगितले की, “माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये, मी लिप जॉबवर चर्चा केली, तेव्हा अनेक लोकांनी मला समोर आले म्हणून बहादूर असे म्हटले. मी जे काही केले ते माझ्या कामाचा भाग होता, ते मला बॉम्बे वेल्वेट या चित्रपटासाठी करावे लागले होते. मी खोटं नाही बोलणार आणि मी हे नाही बोलणार की, मी हे काही केलेच नाहीये. मी या गोष्टीची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मी चाहत्यांना एवढेच सांगू इच्छिते की, मी पण माणूस आहे आणि मी देखील परफेक्ट नाहीये.”

सन 2014 मध्ये अनुष्काने सांगितले होते की, ती टेम्पररी लिप इनहान्सिंग टूलचा वापर करत आहे. पण यात तिने कोणत्याही प्रकारची सर्जरी केली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post