Friday, January 30, 2026
Home बॉलीवूड आदित्य नारायण मुनव्वरच्या निशाण्यावर; ‘पापा कहते हैं…म्हणत केले ट्रोल

आदित्य नारायण मुनव्वरच्या निशाण्यावर; ‘पापा कहते हैं…म्हणत केले ट्रोल

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान आदित्यने त्याच्या चाहत्यांसोबत गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. चाहत्यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत त्याला ट्रोल केले. आता या बिग बॉस १७ चा विनर मुनव्वर फारुकीची भर पडली आहे. मुनव्वरने त्याच्याच वडिलांच्या गाण्याचे लिरिक्स लिहित त्याच्यावर संताप व्यक्त केल आहे.

लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याच्या हातावार आदित्यने मारलं, त्याचा फोन हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर त्याने चाहत्याचा फोन फेकूनही दिला असल्याची घटना घडली. यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान आता मुनव्वरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुन्नवरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. आदित्य नारायणचे वडिल उदित नारायण यांचे गाणं ‘पापा कहते हैं’ याचे लिरिक्स लिहले आहेत.

‘पापा कहते हैं बदनाम करेगा, बेटा हमारा ऐसा कांड करेगा’, असे लिहित मुनव्वरने #AdityaNarayan असे पोस्टमध्ये लिहले आहे. त्याच्या या पोस्टवर आता युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. भाई तुम्ही तर रोस्टिंग किंग आहात. तर दुसऱ्या एका युजरने आदित्याची ही वर्तवणुक चांगली नाही, उदित नारायण नेहमी त्यांच्या चाहत्यांचा आदर करतात. अशा अनेक कमेंट्स मुनव्वरच्या पोस्टवर आल्या आहेत.

आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्टसाठी गेला होता. या कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी आदित्य शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटामधील गाणं गात होता. दरम्यान आदित्यचा संयम सुटला. एक चाहता त्याच्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आदित्यचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने माईकने त्याच्या हातावर मारलं, नंतर फोन हिसकावून गर्दीत फेकून दिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याने असे का केलं? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्तचे नावं वगळले, जाणून घ्या नवीन बदल
अरबाज खानची पत्नी शुरा खानचे इंस्टाग्राम अकाउंट झालेले हॅक, सोशल मीडियावर दिली माहिती

हे देखील वाचा