Monday, October 27, 2025
Home मराठी ‘सत्यप्रेम की कथा’ च्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो व्हायरल

‘सत्यप्रेम की कथा’ च्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो व्हायरल

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने जुईली सोनलकर हिच्याशी गुपचुप साखरपुडा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर समीर विद्वांसच्या खरपुड्याचे फोटो शेअर केला आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हॅलेंटाइन्स डेला समीर यांनी जुईली सोनलकरशी साखरपुडा केला. समीर यांनेही इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दोघांनी कपड्याची थीम ऑफ व्हाइट रंगाची ठेवली होती. या दोघेही खुप सुंदर दिसत होते.

जुईली सोनालकरसोबत समीर विद्वांसने व्हॅलेंटाइन डे दिवशी साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या फोटोवर कमेंट करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कियारा अडवाणीने कमेंटमध्ये शुभेच्छा देत ब्लॅक हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. कियाराच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दिग्दर्शनाच्या प्रवासातही समीरला जुईलीची साथ
दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर हा अभिनेता आणि उत्तम लेखकही आहेत. अनेक मराठी चित्रपटाचं त्याने लेखन केलं आहे. तर ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘व्हाय झेड’, ‘धुरळा’, ‘टाइम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच दिग्दर्शन करत त्याने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. जुईली सोनलकरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून समीरसोबत काम केले होते. जुईली आणि समीर यांनी २०१७ मध्ये ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र काम केले होते.

यानंतर जुईली सोनालकरने २०१९ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात समीर विद्वांसला मदत केली होती. समीर आणि ज्युली यांनी २०२० मध्ये आलेल्या ‘धुरळा’ चित्रपटाचे दिग्दर्शनही एकत्र केले होते. याशिवाय स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजचेही या जोडीने दिग्दर्शन केले होते.

हे देखील वाचा