Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

‘वीर की अरदास वीरा’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या वडिलांचे दुखःद निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्नेहाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. स्नेहाने सांगितले की, तिच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाला होता. तसेच त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. या कारणाने त्यांचे निधन झाले आहे. 27 एप्रिलला स्नेहाच्या वडिलांनी शेवटाची श्वास घेतला.

स्नेहाने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की, “प्रिय पप्पा, तुम्ही तुमच्या शब्दांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हरवलेलं हसू परत आणत होते. कारण त्यांचा दिवस चांगला जावा, असे तुम्हाला सतत वाटत असे. तुम्ही एक धैर्यवान आणि चांगल्या मनाचे व्यक्ती होता. तुम्हीच आम्हाला आत्मविश्वास दिला आहे, आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायला शिकवले होते. आम्हाला आमची स्वप्न पूर्ण करायला शिकवले. तुम्ही नेहमीच आम्हाला प्रामाणिक राहायला शिकवले आहे. तुम्ही आमचे हिरो आहात आणि नेहमी राहणार आहात. हो गोष्ट ऐकून खूप दुःख होते की, आता आम्हाला एकटेपणाने राहायला लागणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही, एवढंच काय तर शेवटच्या क्षणी नीट बाय पण बोलता आले नाही. आता आमचे आयुष्य पहिल्यासारखे कधीच सुरळीत होणार नाही.”

स्नेहाने दुसऱ्या पोस्टमध्ये तिच्या वडिलांसोबतचा एका फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “अनेक महिन्यांपासून न्यूमोनिया आणि कोरोनाशी लढत असणाऱ्या माझ्या वडिलांना मी आज गमावले आहे. आमच्या हृदयाचे हजार तुकडे झाले आहेत. या परिस्थितीचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. तुम्ही आयुष्यात कितीही संकटातून जात असाल, पण त्या क्षणी जर तुमच्या सोबत तुमचे आई वडील असेल, तर तुम्हाला त्या दुःखाची झळ देखील लागणार नाही.”

स्नेहाच्या हा पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करून दुःख व्यक्त केले आहे. तसेच तिचे चाहते देखील कमेंट करून तिच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना युद्धात भारताच्या ‘गानकोकिळे’चा सहभाग; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केली मोठ्ठी मदत!

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात’, म्हणत रणबीर कपूरने पॅपराजींना चांगलेच सुनावले

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

हे देखील वाचा