Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्री-वेडिंगनंतर राधिकाने पहिल्यांदाच दिले स्टेटमेंट; म्हणाली, ‘हे सौभाग्य सर्वांनाच मिळत नाही’

राधिका मर्चंट ही अंबानी कुटुंबाची भावी सून आहे. अलीकडेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नाआधी एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अनेक व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते. सलग तीन दिवस या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याचवेळी आता नववधू राधिका मर्चंटने लग्नाआधीच्या कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली आहे.

अनंत अंबानींची नववधू राधिका मर्चंट सध्या चर्चेत आहे. नुकतेच जेव्हा तिला विचारण्यात आले की प्री-वेडिंग कार्यक्रमानंतर तिला कसे वाटते. या प्रश्नाच्या उत्तरात राधिका म्हणते, “मी ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते की आमच्यासाठी इतके आयोजन केले गेले. हे सौभाग्य फार कमी लोकांनाच मिळते.”

राधिका पुढे म्हणाली, “अनंत आणि मी ‘वंतारा’साठी खूप उत्सुक आहोत. आमच्या लग्नाच्या माध्यमातून योग्य लोकांचे लक्ष या निष्पाप प्राण्यांकडे वेधले जावे, अशी आमची इच्छा आहे. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी आणखी पुनर्वसन केंद्रे बांधली पाहिजेत. हा प्रोजेक्ट माझ्या आणि अनंत दोघांसाठी खूप खास आहे. आम्ही दोघे प्राणीप्रेमी आहोत.”

राधिका आणि अनंत हे बालपणीचे मित्र आहेत. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत अंबानी हा मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा आहे, तर राधिका ही श्रीमंत उद्योगपती बीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका आणि अनंत या वर्षी १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

स्ट्रोकमधून बरे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती गेले सुट्टीवर, सुनेने केला फ्लाईटमधील फोटो शेअर
डान्समुळे ट्रोल करणाऱ्यांना दीपिका सिंगने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मला काहीही फरक पडत नाही..’

हे देखील वाचा