Friday, January 3, 2025
Home बॉलीवूड …अन् म्हणून भर पुरस्कार सोहळ्यात ॲटलीने धरले शाहरुख खानचे पाय, दिग्दर्शकाच्या कृतीने वेधले लक्ष

…अन् म्हणून भर पुरस्कार सोहळ्यात ॲटलीने धरले शाहरुख खानचे पाय, दिग्दर्शकाच्या कृतीने वेधले लक्ष

2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर जर कोणत्या स्टारने राज्य केले असेल, तर तो शाहरुख खान आहे. त्याचा ‘पठाण’ चित्रपट असो की ‘जवान’ किंवा ‘डंकी’, हे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याचवेळी काल रात्री झालेल्या ‘झी सिने अवॉर्ड्स 2024’मध्ये शाहरुख खानची (shahrukh Khan) क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसली आहे. त्याच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले. अशातच शाहरुख खान आणि ‘जवान’ दिग्दर्शक ॲटली यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया त्या व्हायरल व्हिडिओबद्दल…

‘जवान’ हा चित्रपट 2023 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील शाहरुख खानची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तर ‘जवान’चे दिग्दर्शन ॲटली यांनी केले असून त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ऍटलीच्या नावाची घोषणा होताच तो उठला आणि शाहरुख खानच्या पाय पडला.

शाहरुख खान आणि ॲटलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चित्रपट दिग्दर्शक ॲटली त्याच्या पाय पडताना दिसत आहे. ऍटलींच्या या वागण्याचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. त्याचवेळी शाहरुख हसत हसत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ॲटली थांबत नाही. शाहरुखने लगेच ऍटलीला घट्ट मिठी मारली आणि पुरस्कारासाठी त्याचे अभिनंदन केले.

ॲटली हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील बड्या दिग्दर्शकांपैकी एक असून ‘जवान’ हा त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा ​​दिसले होते. ॲटलीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’मध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नवीन टिझर प्रदर्शित
करिष्मा कपूरने केला करिअरमधील चढ-उतारांचा खुलासा; म्हणाली, ‘आमच्या वेळी पीआर टीम…’

हे देखील वाचा