Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड भन्साळीचा ‘देवदास’ न केल्याचा मनोज बाजपेयीला पश्चाताप; व्यक्त केली ‘ही’ खंत

भन्साळीचा ‘देवदास’ न केल्याचा मनोज बाजपेयीला पश्चाताप; व्यक्त केली ‘ही’ खंत

मनोज बाजपेयी (Manoj Bajpeyee) यांचा ‘भैयाजी’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. हा चित्रपट काही खास कमाई करत नसला तरी मनोज बाजपेयी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो. एका मुलाखतीत जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की, त्याला कोणताही चित्रपट नाकारल्याचा खेद वाटतो का? यावर अभिनेत्याने सांगितले की, संजय लीला भन्साळी यांचा ‘देवदास’ हा चित्रपट सोडला तर त्याने कोणताही चित्रपट नाकारलेला नाही, ज्याने खूप चांगली व्यावसायिक कामगिरी केली आहे.

अभिनेत्याने सांगितले की, “मला भन्साळीच्या चित्रपटात देवदासची भूमिका करायची होती, जी शाहरुख खानकडे गेली होती. अभिनेताला त्याच्या थिएटरच्या दिवसांपासून देवदासची भूमिका करायची होती.”

यूट्यूबवर दिलेल्या एका मुलाखतीत, जेव्हा मनोज बाजपेयींना विचारण्यात आले की, त्यांनी कधीही मोठा हिट झालेला चित्रपट नाकारला आहे का? तो स्पष्टपणे नाही म्हणाला. अभिनेता पुढे म्हणाला, “होय, मला देवदासमध्ये जॅकी श्रॉफच्या भूमिकेची ऑफर आली होती, पण मी लगेच नकार दिला. मी संजयला म्हणालो, संजय, मित्रा, मला नेहमी देवदास करायचा होता. तो चित्रपट सुपरहिट झाला, पण तो सोडल्याचा मला पश्चाताप झाला. मला माझ्या थिएटरच्या दिवसांपासून देवदासची भूमिका करायची होती. पण याचं मला कधीच वाईट वाटलं नाही.”

‘हिरामंडी’च्या प्रमोशनदरम्यान शेखर सुमनने असेही सांगितले होते की, त्याला देवदासमध्ये चुन्नीलालची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु त्याच्या व्यस्त शेड्यूलमुळे तो भूमिका करू शकला नाही. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या करिअरमध्ये ‘देवदास’ हा मैलाचा दगड ठरला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कोटींची ऑफर दिली तरी लग्नात न गाणाऱ्या केकेने नेहमीच स्वतःच्या तत्वांवर जगले आयुष्य
KK struggle | केके सुरुवातीला करत होते हॉटेलमध्ये काम, हरिहरन यांच्या सांगण्यावरून गाठली मुंबई, वाचा तो किस्सा

हे देखील वाचा