Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानचा दबदबा, कडक बंदोबस्तात केली एन्ट्री

सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानचा दबदबा, कडक बंदोबस्तात केली एन्ट्री

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल यांचे लग्न झाले आहे. रविवारी (23 जून) दोघांचे लग्न झाले. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या काही तासांनंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनिल कपूर, रेखा, रवीना टंडन, काजोल, अरबाज खान, हनी सिंग आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, सलमान खानच्या धमाकेदार एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सोशल मीडियावर सलमानचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये, अभिनेता मुंबईच्या लिंकिंग रोडवर असलेल्या बास्टन या ट्रेंडी रेस्टॉरंटमधील रिसेप्शनच्या ठिकाणी भव्य प्रवेश करताना दिसतो. कडक सुरक्षा व्यवस्थेत नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी अभिनेता पोहोचला. काळ्या रंगाच्या सूटमध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता. सोनाक्षी आणि झहीरचे अभिनंदन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर तो रिसेप्शनमधून लवकर निघून गेला.

सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये दोघेही ‘आफरीन आफरीन’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसले. दोघे एकत्र आनंदी दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत होती. काजोलने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नवविवाहित जोडप्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

लग्नानंतर सोनाक्षी पहिल्यांदाच लाल रेशमी साडी परिधान करताना दिसली होती, ज्यामध्ये तिने हिरवा आणि सोनेरी नेकलेस, मॅचिंग ड्रॉप इअरिंग्ज आणि लाल बांगड्या घातल्या होत्या. रिसेप्शन पार्टीत तिने कपाळावर सिंदूर लावलेला दिसला. तर झहीरने लाइट गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी शेरवानी परिधान केली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी नुकतीच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नागार्जुनच्या बॉडीगार्डने अपंग चाहत्याला ढकल्याने अभिनेता ट्रोल; सोशल मीडियावर मागितली माफी
आमिर खानच्या मुलाचा पहिला चित्रपट ‘महाराज’ प्रदर्शित; प्रेक्षकांना भावला चित्रपट

हे देखील वाचा