कल्की 2898 AD या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. नुकतेच या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या पडद्यावर येण्याआधीच या चित्रपटाने करोडोंची कमाई सुरू केली आहे. आगाऊ बुकिंग करून चित्रपटाने आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमवला आहे ते जाणून घेऊया.
कल्की 2898 AD चे आगाऊ बुकिंग 23 जून पासून सुरु झाले आहे. आता पर्यंत चित्रपटाची ५ लाख ६२ हजार ९४५ तिकिटे विकली गेली होती. देशभरातील 9012 शोसाठी ही तिकिटे बुक करण्यात आली आहेत. कमाईबद्दल बोलायचे तर या तिकिटांवरून चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे एकूण कलेक्शन 17.43 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
चित्रपटाची सर्वाधिक आगाऊ बुकिंग तेलुगू भाषेत केली जात आहे. 2D आणि 3D सह चित्रपटाच्या एकूण आगाऊ बुकिंगने 15.16 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2D मध्ये या चित्रपटाची दोन लाख 69 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय तेलगू थ्रीडीमध्ये चित्रपटाची दोन लाख १७ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
त्याचबरोबर या चित्रपटाला हिंदी भाषेतही चांगली ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगमधून 1 कोटी 17 लाखांची कमाई केली आहे. हिंदी थ्रीडी चित्रपटाची आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्याचबरोबर टूडीमध्ये या चित्रपटाची सहा हजार तिकिटे विकली गेली आहेत. परदेशातही या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हा चित्रपट जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई करू शकतो.
चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर, कल्की 2898 एडीमध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन सारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 27 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
करीनाने वाढदिवसानिमित्त करिश्मावर केला प्रेमाचा वर्षाव; फोटो शेअर करत लिहिले, ‘तू माझ्यासाठी हिरो आहेस…’
कंगनाने घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ; म्हणाली, यावेळी विरोधक अधिक जबाबदार…’










