Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

फॅशन इन्फ्ल्यूएन्सर सूफी मोतीवाला उर्फी जावेदच्या निशाण्यावर, अश्लील संदेश पाठवल्याबद्दल फटकारले

सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर उर्फी जावेद (Urfi Jawed) तिच्या आगळ्यावेगळ्या स्टाईल आणि रंगीबेरंगी कपड्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता उर्फीने इन्स्टाग्रामवर तिला अश्लील आणि अपमानास्पद संदेश पाठवल्याबद्दल फॅशन समालोचक आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सूफी मोतीवाला यांची निंदा केली आहे.

फॅशनिस्टा असण्याव्यतिरिक्त, उर्फी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते आणि ती सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्याची कोणतीही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या फोटोज आणि व्हिडिओंबाबत गैरवर्तन करणाऱ्या किंवा ट्रोल करणाऱ्या लोकांवर चांगलाच प्रहार करते.

अलीकडेच उर्फीने तिच्या एका व्हिडिओखाली तिचा मित्र असलेल्या ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ऑरीच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ऑरी लिहितो कि , ‘मला हे फार आवडले.’ उर्फीला ही कमेंट आवडली आणि तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ती शेअर केली. हि पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच सुफीने उर्फीबद्दल काही अश्लील कमेंटही केल्या. तथापि, उर्फी या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत नव्हती आणि तिने सूफी मोतीवाला यांच्या खात्याची तक्रार केली.

त्यानंतर सुफी यांनी एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की मला हा संदेश दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचा आहे. मात्र, चुकून तो उर्फीला पाठवला गेला. उर्फीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले कि, ” कदाचित सुफी हा प्रतिसाद त्याच्या मित्राला पाठवत होता, चुकून त्याने तो मला पाठवला. दुर्दैवाने मी त्यावेळी ऑनलाइन होते आणि मी लगेच त्याचा स्क्रीनशॉट घेतला. त्याचा कोणताही आयडी हॅक झालेला नाही, २ मिनिटांत त्याला आयडी परत मिळाला.”

दरम्यान, सूफीच्या इंस्टाग्राम स्टोरीचा आणखी एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे ज्यात लिहिले आहे कि, माझा असा कोणताही हेतू नव्हता आणि मी असा मेसेज कोणालाही पाठवणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कतरिना कैफला आवडला विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ चित्रपट, सोशल मीडियावर केले कौतुक
वर्षानुवर्षे जुने वैर विसरण्यासाठी हनी सिंगने मागितली होती बादशाहची माफी, रॅपरने दिली अशी प्रतिक्रिया

 

हे देखील वाचा