Sunday, October 20, 2024
Home मराठी ‘तुम्ही ‘बिग बॉस मराठी 5’ का होस्ट करत नाही?; महेश मांजरेकरांनी सांगितले मोठे कारण

‘तुम्ही ‘बिग बॉस मराठी 5’ का होस्ट करत नाही?; महेश मांजरेकरांनी सांगितले मोठे कारण

नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक नवनवीन सरप्राईज बघायला मिळत आहेत. या नवीन सिझन मध्ये. बिग बॉस मराठीचा होस्टही बदलला आहे. महेश मांजरेकर यांनी पहिले चार सिझन होस्ट केले होते. पण या नव्या सिझनची होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांना विचारण्यात आले आहे की तुम्ही ‘बिग बॉस मराठी 5’ का होस्ट करत नाही?

अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना महेश मांजरेकर यांनी अगदी मनमोकळा संवाद साधला. जेव्हा त्यांना ‘बिग बॉस’ बद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, “मी जेव्हा बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा फक्त एक वर्षाचा करार होता. मी बिग बॉस होस्ट करण्याआधी कधीच पाहिलं नव्हतं.” पण, जेव्हा मी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं की हा एक अतिशय मनोरंजक खेळ आहे, त्यानंतर मग मी एक,दोन,तीन आणि चार सीझन केले.

पुढे ते म्हणाले,”शो च्या निर्मात्यांना पाचव्या सीझनमध्ये खरंच वाटलं असेल की मी रिपीटेटिव्ह होतोय. त्यांना जे हवंय ते कदाचित माझ्यात नसेल. पण, जेव्हा मला पहिल्यांदा होस्ट करण्याची संधी दिली होती. तेव्हा मला वाटलेलं की मी का? म्हणजे तेव्हाही खूप स्टार्स होतेच. त्यामुळे आज रितेशचं नाव ऐकल्यावर मलाही वाटलं, अरे क्या बात है। नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही, तसं असतं तर मी कधीच बिग बॉस होस्ट करू शकलो नसतो. चार वर्ष मी बिग बॉस खूप एन्जॉय केलं. होस्ट बदलायचा की नाही हे त्यांच्या हातात आहे. मी होस्ट करत असल्याने दरवर्षी बिग बॉस बघायचो.. कारण मला ते होस्ट करायला लागायचं. पण, मी यावर्षीही तितक्याच आवडीने ते बघेन, मी जे काही केलंय त्याचा आनंद आहे. मला वाटतं की लोकांनाही बदल हवाय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सर्वांशी वाद घालणाऱ्या निक्कीला गुलीगत सुरज चव्हाणने दिले प्रत्युत्तर; केली बोलती बंद
कोण आहे शिव ठाकरेची मिस्ट्री गर्ल ? नेटकरी करत आहेत चर्चा

हे देखील वाचा