Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड ‘जोपर्यंत लोक मला गोळी मारत नाही तोपर्यंत मी काम करेन!’ अपयशाच्या प्रश्नावर अक्षयचे सडेतोड उत्तर…

‘जोपर्यंत लोक मला गोळी मारत नाही तोपर्यंत मी काम करेन!’ अपयशाच्या प्रश्नावर अक्षयचे सडेतोड उत्तर…

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. बॅक टू बॅक चित्रपट करण्यासाठी तो ओळखला जातो. सध्या तो त्याच्या आगामी ‘खेल खेल में’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकार एकत्र दिसले. यादरम्यान अक्षयने त्याच्या अलीकडच्या चित्रपटांच्या खराब बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल सांगितले आहे.

आजकाल अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करत नाहीत. अशा परिस्थितीत ट्रेलर लाँचच्या वेळी त्याने दिलेल्या उत्तराने लोकांचे लक्ष वेधले आहे. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते, असे अक्षय म्हणाला. तो म्हणाला की लोक त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतात आणि म्हणतात, ‘ठीक आहे यार, काळजी करू नको. सगळे काही ठीक होईल. अहो, मी काही मेलेलो नाही.”

अक्षय पुढे म्हणाला की, काही पत्रकार आहेत जे त्याला सांगतात की काळजी करू नको, तू परत येशील. याला पुढे जोडून तो म्हणाला, “मी चित्रपटांत आलो आहे, इथेच आहे आणि मी नेहमी हेच काम करेन.” लोक काहीही म्हणतील, मी जे काही कमावतो ते मी स्वतः कमावतो.” यादरम्यान अभिनेत्याने गंमतीत सांगितले की, जोपर्यंत लोक मला गोळी मारत नाही तोपर्यंत मी काम करेन.

अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलेली नाही. यामध्ये नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सरफिरा’चा देखील समावेश आहे. सरफिरा हा यशस्वी तमिळ चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा अधिकृत रिमेक होता. याशिवाय ‘मिशन रानीगंज’, ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’ यांसारखे यापूर्वीचे काही चित्रपटही चालले नाहीत. तेव्हापासून तो पडद्यावर जास्त दिसत असल्याचा मुद्दा सातत्याने उठू लागला आहे.

‘खेल-खेल में’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षय व्यतिरिक्त एमी विर्क, आदित्य सील, फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू, प्रज्ञा जैस्वाल इत्यादी दिसणार आहेत. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे, जो तीन विवाहित जोडप्यांभोवती फिरतो. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’शी स्पर्धा होणार आहे. तसेच जॉन अब्राहमचा ‘वेदा’ देखील त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राघव चढ्ढा यांनी संसदेत उपस्थित केला पायरसीचा मुद्दा! परिणीती म्हणाली, ‘तुम्ही स्टार आहात’
अभिनेत्री तब्बूने बॉलिवूडमधील वेतन समानतेबद्दल मांडले मत; म्हणाली, ‘मला ते आवडत नाही..’

हे देखील वाचा