बिग बॉस मराठीचा नवीन सिझन सुरु झाला आहे. प्रत्येक दिवशी एक नवा ड्रामा बघायला मिळत आहे. काही दिवसांपासून निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात वारंवार खटके उडताना दिसत आहेत. यादरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मल्हारची भूमिका साकारून घराघरात पोचलेला अभिनेता कपिल होनराव वर्षा उसगावकर यांच्या सोबत होत असणाऱ्या गैरवर्तणूकीवर संतापला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
कपिल होनराव आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यात त्या दोघांची आई आणि मुलाची भूमिका होती. बिग बॉसमध्ये वर्षा यांना निक्की तांबोळी कडून मिळणाऱ्या हीन वागणुकीविषयी संताप व्यक्त केला आहे.
कपिल होनरावने वर्षा उसगावकर यांच्या सोबतचा एक फोटो शेयर केला आहे. फोटो सोबत त्याने लिहिले कि,. खंबीर राहा माई. ज्यांनी तुला खूप त्रास दिला. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं, त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र. आशा आहे कि रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील सगळ्यांची. या पोस्टवर नेटकरी देखील आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’मधील अनिल कपूरचे होस्टिंग प्रेक्षकांना कसे वाटले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु
‘खेल-खेल में’ ही ‘परफेक्ट स्ट्रेंजर्स’ची कॉपी नाही, या चित्रपटांपासून प्रेरित कहाणी